Headlines

विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या हातभार कौतुकास्पद….

नागेश मोरये :प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वह्या वाटप ; नांदगाव पंचक्रोशीत ५ हजार वह्या वाटपाचा टप्पा पूर्ण..

⚡कणकवली ता.२९-:
नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर व पत्रकार भगवान लोके यांनी घेतलेला वह्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. नेहमीच सरस्वती हायस्कुल नांदगावमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आम्ही विविध उपक्रम राबवत असतो, त्याला हातभार लावण्याचे काम प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने झाले आहे. आमच्या हायस्कुलमधील विद्यार्थ्यांना हे वह्या वाटप झाले आहे. आम्ही बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराबरोबरच कल्पवृक्ष वाटप करत होतो. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसाठी आमचे सहकार्य असेल, असे प्रतिपादन नांदगाव पंचक्रोशी शिक्षण समितीचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले.

प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने व शिवशक्ती मल्टिस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती हर्षदा वाळके, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , संस्थेचे संचालक दाजी मोरये , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, महेश लोके , प्रविण डगरे, रघुनाथ लोके, वासुदेव दळवी, रामचंद्र जेठे, बाळकृष्ण परब, विजय खरात, पंकज आचरेकर , ग्रा.प.सदस्य आनंद तांबे , पत्रकार ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे , शिक्षक रघुनाथ कारेकर , राजेश नारकर ,उपेंद्र पाटकर , संजय सावंत , श्रीकांत सावंत , शिक्षिका शर्वरी सावंत ,कविता नलावडे , श्रावणी मोरये , हरिदास खारोडे , रामचंद्र नादकर , प्रभाकर सोळंके , संतोष गोसावी , सुनील पारधीये आदी उपस्थित होते.
सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या,विद्यार्थ्यांनी मोठे होवून आपल्या गावाबद्दल व शाळेबद्दल आत्मियता ठेवावी. विद्यार्थ्यांनी आय चा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. शिक्षक ज्ञानदान करताना विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांनी बोलल्यावर रागावू नये. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून होणारे हे उपक्रम समाजाला पुढे नेणारे आहेत. समाजाच्या हितासाठी आपण काम करत आहोत. भगवान लोके यांचे या हायस्कुलशी नाते जोडलेले असल्याने त्यांनी हा पुढाकार घेवून उपक्रम हाती घेतला आहे.
भगवान लोके म्हणाले, नांदगाव पंचक्रोशीतील नांदगाव , असलदे , तोंडवली – बावशी , आयनल , कोळोशी या 5 गावांमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक 18 शाळा व सरस्वती हायस्कुल नांदगाव माध्यमिक शाळा एकूण 19 शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. या पंचक्रोशीतील गावांमध्ये तेथील लोकप्रतिनीधींच्या उपस्थितीत मोफत 5 हजार वह्या वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे.त्याबद्दल प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांचे ऋण व्यक्त करतो. सरस्वती हायस्कुलमध्ये हा कार्यक्रम करताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे, कारण या हायस्कुलचे आम्ही सर्वजण विद्यार्थी आहोत. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात चांगले काम उभे राहत आहे. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा वापर करुन गुणवत्ता वाढवावी. नागेश मोरये यांनी आपल्या जीवनात शैक्षणिक संस्थेसाठी चांगले काम उभं केलं आहे.
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या यशाचे शिखर गाठावे. मातृदेव भव , पितृदेव भव , गुरुदेव भव या विचाराने विद्यार्थ्यांनी जीवनात जाण ठेवली पाहिजे. शिक्षकांची विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी तळमळ असते.
या कार्यक्रमात हायस्कुलच्यावतीने सभापती हर्षदा वाळके , जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या संस्थेत कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष नागेश मोरये यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page