⚡बांदा ता.२९-: मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथील खालसा धाब्यासमोर अचानक बैल आडवा आल्याने मोटारीला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरून मोटार जात असताना अचानक बैल रस्त्यावर आडवा आला. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाला धडक बसल्याने मोटारीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहतुकीची वर्दळ झाली. सुदैवाने मोटारीतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
महामार्गावर भटक्या जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. संबंधित यंत्रणेने महामार्गावरील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
फोटो:-
बांदा येथे बैल आडवा आल्याने मोटार अपघातग्रस्त झाली.
खालसा धाब्यासमोर बैल आडवा आल्याने मोटारीला अपघात…
