Headlines

Global Maharashtra Breaking News

आम.वैभव नाईक यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वयंभू मंदिरात महारुद्र

ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने आयोजन ⚡कणकवली ता.२५-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते महारुद्र करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, पत्नी मयुरी नाईक,युवा…

Read More

योग साधकांकडून १०८ सूर्यनमस्कारांचा उपक्रम

⚡मालवण ता.२४-: मालवण येथील योग ज्योती ग्रुपतर्फे महिला दिन व गुढीपाडवा हिंदू नववर्षाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे १०८ सूर्यनमस्कार घालण्यात आले. योग प्रशिक्षिका सौ. दीपा वनकुद्रे यांच्या नेतृत्वाखाली ३१ महिला योग साधक सहभागी झाल्या होत्या. यामध्ये लहान मुलींपासून तरुण ते वयस्कर महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये पारंपारिक नऊवारी साडी नेसून महिलांनी १०८ सूर्यनमस्कार…

Read More

10 -12 वी विद्यार्थ्यांसाठी युनिक अकॅडमीचे ‘उन्हाळी स्पर्धा परीक्षा शिबीर

⚡कणकवली ता.२५-: दहावी व बारावी च्या परीक्षा संपल्यावर नेमकं कोणतं करियर निवडायच? काय करायचं? या संभ्रावस्थेत असणारेजिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांना विविध स्पर्धा परीक्षांची करियर च्या महत्त्वाच्या टप्प्यावर माहिती करून घेणे अत्यंत गरजेचं आहे . विद्यार्थी कॉलेज ची डिग्री किंवा पदवी पूर्ण करत असतानाच एखाद्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर पोहोचू शकतात,या संदर्भात योग्य माहिती मिळावी…

Read More

सत्यवान रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान

⚡कणकवली ता.२५-: प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात ४ ते ६ एप्रिल २०२३ रोजी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्याने होणार आहेत.स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या व्याख्यानांचे वादळ निर्माण करणारे, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर…

Read More

कासव महोत्सव वायंगणी 2023

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🐢 कासव महोत्सव वायंगणी 2023 🐢 🐢 Turtle Festival Wayangani 2023 🐢 🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢 🟢 शनिवार 25 मार्च व रविवार 26 मार्च 2023 ❇️ श्रीम.के.मंजुलक्ष्मी – जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ❇️ श्री.सौरभ अग्रवाल – पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग ❇️ श्री.प्रचित नायर – मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग ❇️ श्री.एस.नवकिशोर रेड्डी – उपवनसंरक्षक सावंतवाडी ❇️ श्री.नागेश दप्तरदार –…

Read More

मालवणात व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक

विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त परताव्याचा आमिषातून प्रकार ⚡मालवण ता.२४-: विदेशी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त परताव्याचा लाभ मिळण्याच्या आमिषातून मालवण मधील एका व्यापाऱ्यांची सुमारे १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात दाखल झाली असून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या…

Read More

मालवण समुद्र किनारी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माविम प्रयत्नशील- दत्तात्रय दिवेकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीसाठी माविमने चार दिवस व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. अशा प्रदर्शनामधून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास निश्चित प्रयत्न होणार आहेत. असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त…

Read More

मालवणात होणाऱ्या गाबीत महोत्सवाला एक ते दीड लाख गाबीत बांधवांची उपस्थिती राहणार

परशुराम उपरकर;गाबीत बांधवांच्या सहकार्याने गाबीत महोत्सव यशस्वी करणार ⚡मालवण ता.२४-: विखुरलेल्या गाबीत समाजाला एकत्र आणतानाच गाबीत बांधवांचे प्रश्न संघटीतरित्या सोडविण्याच्यादृष्टीनेमालवणच्या दांडी किनाऱ्यावर दि. २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत होणारा गाबीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून गाबीत समाजाच्या या पहिल्या वहिल्या या महोत्सवाला चार दिवसात महाराष्ट्रासह गुजरात, गोवा कर्नाटक अशा चार राज्यातील एक ते…

Read More

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात कार्यक्रम

⚡मालवण ता.२४-: शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण- कुडाळ चे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरामध्ये दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वा. मालवण शहरातील वीज महावितरण मंडळाच्या वायरमन, लाईनमन यांचा सत्कार शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित…

Read More

आनंदाचा शिधा होणार लवकरच वितरीत

बांदा विकास सोसायटी उपाध्यक्ष बाळू सावंत यांची माहिती बांदा/प्रतिनिधीराज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी जाहीर केलेला आनंदाचा शिधा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोदामातच अडकून राहिल्याने गुढीपाडव्याला वितरित करताना अडचणी निर्माण झाल्यात. येत्या काही दिवसातच याचे योग्य नियोजन करून हा आनंदाचा शिधा लवकरच वितरित करण्यात येईल असे आश्वासन बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी पत्रकातून दिले आहे….

Read More
You cannot copy content of this page