Headlines

Global Maharashtra Breaking News

बांधकाम कामगारांचे आर्थिक लाभाचे प्रस्ताव मंजुरीचे प्रयत्न करणार

सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली ग्वाही ⚡कणकवली ता.०१-:सिधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९/२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाइन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष भगवान साटम यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम…

Read More

कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा

आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना ⚡मालवण ता.०१-: कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने आज कोळंब ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार श्रीम. झालटे…

Read More

विलवडे धरणातील गाळ उपशाला प्रारंभ…

बांदा/प्रतिनिधीगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज १ जून २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता मा. प्रांताधिकारी श्री प्रशांत पानवेलकर साहेब यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री रामचंद्र धोत्रे ग्रामपंचायत सरपंच श्री प्रकाश दळवी, भूमी अभिलेख…

Read More

गवारेड्यांच्या झालेल्या झुंजीत एका गवारेड्याचा मृत्यू

⚡वेंगुर्ले ता.०१-: पालकरवाडी येथे आज पहाटे गवारेड्यांच्या झालेल्या झुंजीत एका गवारेड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे 5.30 ते 6 वा. च्या दरम्यान घडली.एका गवारेड्याच्या कळपाने त्या एकट्या असलेल्या गवारेड्यावर हल्ला केल्याने त्यात तो मृत्युमुखी पडला. आज सकाळी 9.30 वा. पालकरवाडी येथे शेतात गवारेडा मृतावस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत रवींद्र महादेव वराडकर यांनी वनविभागाला…

Read More

नांदगाव गावस्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण

वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना पुरस्कार जाहिर ⚡कणकवली ता.०१-: नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून या पुरस्काराचे पुरस्कार वितरण सोहळा नांदगाव ग्रामपंचायत येथे नुकतेच संपन्न झाले .पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह रोख…

Read More

मालवणात युवतीसेनेतर्फे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार विविध दाखले

⚡मालवण ता.०१-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवतीसेना मालवणच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे विविध दाखले मालवण शिवसेना शाखा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन मालवण युवती सेना तालुका संघटक सौ. निनाक्षी शिंदे- मेतर यांच्याशी किंवा मालवण शिवसेना शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना युवासेना…

Read More

आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान राखून काम करा

कणकवली “शासन आपल्या दारी”चा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ ⚡कणकवली ता.०१-:आमच्या सरकारच्या योजना यापुढील काळात अधिकाऱ्यांनी लोकांसाठी राबवताना मेहनत घ्यावी. आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान राखून काम करावे.”शासन आपल्या दारी” हा शिंदे ,फडणवीस सरकारचा क्रांतिकारी उपक्रम असल्याचे प्रतिपादन कणकवली विधानसभेचे आ. नितेश राणे यांनी केले. कणकवली येथील भगवती सभागृहात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार…

Read More

बांदा गवळीटेंब ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर रस्ता डागडूजी सुरु…

⚡बांदा ता.०१-: बांदा शहरातील गवळीटेंब ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आज डॉ. रुपेश पाटकर घर ते वाफोली रस्ता कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी सुरु करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.सदर रस्त्यासंदर्भात बांदा येथील गवळीटेंबवाडी येथील नागरिकांनी बांदा ग्रामपंचायतला निवेदन दिले होते. सदर रस्ता हा पूर्णपणे नादुरुस्त असून वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनलेला…

Read More

आयुर्वेद ही प्राचीन भारतीय जीवनशैली …

पराग गावकर;आडाळीमध्ये आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: आयुर्वेद ही फक्त उपचारपद्धती नसुन ती भारतीय परंपरेतील प्राचीन जीवनशैली आहे. तिचा प्रसार व्हावा, यासाठीच आम्ही आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन आडाळीचे सरपंच पराग गावकर यांनी नुकतेच केले.

Read More

सुमती गुरखे, शर्वरी रावराणे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मानित

नावळे ग्राम पंचायतीने केला गौरव वैभववाडी प्रतिनिधीपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने नावळे गावातील सौ सुमती कोंडू गुरखे आणि सौ शर्वरी सतिशचंद्र रावराणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशासकीय पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. नावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय रावराणे व माजी सरपंच स्नेहा शेळके यांच्या…

Read More
You cannot copy content of this page