⚡बांदा ता.०१-: बांदा शहरातील गवळीटेंब ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आज डॉ. रुपेश पाटकर घर ते वाफोली रस्ता कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी सुरु करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सदर रस्त्यासंदर्भात बांदा येथील गवळीटेंबवाडी येथील नागरिकांनी बांदा ग्रामपंचायतला निवेदन दिले होते. सदर रस्ता हा पूर्णपणे नादुरुस्त असून वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनलेला असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले होते व पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याची डागडुजी न झाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा नेण्याचा ईशारा देखील देण्यात आला होता. याची दखल घेऊन बांदा ग्रामपंचायत प्रशासनाकडून आजपासून सदर रस्त्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यानंतर गवळीटेंबवाडी, शेटकरवाडी व गडगेवाडी या तिन्ही वाडीतील मुख्य रस्ते हे हॉट मिक्स करून देण्यात येतील असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. यावेळी वाडीतील ग्रामस्थ कृष्णा देसाई , डॉ. रुपेश पाटकर, भाऊ वळंजु, गोविंद नाईक, अर्चना आंबेलकर, बाबी आईर, अभिजीत देसाई, स्वानंद पवार, राजन नाईक, पंकज देसाई, सिद्धेश वराडकर, व्यंकटेश ऊरुमकर, शोभना नाईक, मुकुंद सावंत, उमेश तोरस्कर, विकी सावंत, गुरु कल्याणकर, श्रुती वळंजू, वैदेही देसाई आदी उपस्थित होते.
बांदा गवळीटेंब ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर रस्ता डागडूजी सुरु…
