आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान राखून काम करा

कणकवली “शासन आपल्या दारी”चा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

⚡कणकवली ता.०१-:
आमच्या सरकारच्या योजना यापुढील काळात अधिकाऱ्यांनी लोकांसाठी राबवताना मेहनत घ्यावी. आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान राखून काम करावे.”शासन आपल्या दारी” हा शिंदे ,फडणवीस सरकारचा क्रांतिकारी उपक्रम असल्याचे प्रतिपादन कणकवली विधानसभेचे आ. नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथील भगवती सभागृहात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार रमेश पवार,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,मुख्याधिकारी अवधूत तावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती
मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, कृषी अधिकारी सुभाष पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. एन. चौगुले, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग व इतर उपस्थित होते.
आम.नितेश राणे म्हणाले,शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आणि रयतेचे राज्य आले.आता राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आहे.त्यामुळे जनतेला हे रयतेचे राज्य वाटले पाहिजे.जनतेचे आयुष्य सुखकर होण्यासाठी आमच्यासह प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केले पाहिजे.शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहविण्यासाठी हा कार्यक्रम आहे.आता प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना आम्हाला समाधान वाटतं आहे. माझ्या कमी वयात मला कणकवलीच्या जनतेने विधिमंडळात निवडून दिले त्याची आठवण मी सभागृहात बसल्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला येत असते.त्यामुळे राणे कुटुंबीय जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत लोकांचे हित पाहून काम असते. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक आमदार, मंत्री होऊन गेले तरी देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव सातत्याने अग्रभागी राहते असे आम.नितेश राणे म्हणाले.

आ.नितेश राणे म्हणाले,आपण ज्या खुर्चीवर आम्ही बसलो,ते तुमच्यामुळे.. कारण तुम्ही मतदान केले आहे.कमी कालावधीत हा कार्यक्रम घेतल्याबद्दल तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांचे कौतुक आहे.अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे,ज्या पदावर आहात त्या ठिकाणी जनतेची सेवा केली पाहिजे,अधिकाऱ्यांच्या मनात भावना चांगली असली पाहिजे.जनतेची सेवा ही महत्त्वाची आहे.अनेकदा,कागदपत्र हातात असतात, मात्र लाभ देण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नसते,असेही अनुभव आम्हाला तक्रारीतून येत आहेत.वंदे भारत रेल्वे थांबा कणकवलीत नव्हता,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ताबडतोब रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली.तातडीने कणकवलीला थांबा मिळाला आहे.अधिकाऱ्यांना मी सांगेन की आलेल्या माणसाशी चांगलं बोललं पाहिजे,कारण लाभ मिळाला नाही तरी नीट बोलल्याने माणूस समाधानाने गेला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही दोन विकासाची चाके आहेत.लोकांच्या जीवनात बदल कसा घडेल,हे पाहिलं तर चांगले होईल. असे ते म्हणाले.

प्रांताधिकारी जगदीश कातकर म्हणाले,शासन आपल्या दारी व कृषी महोत्सव आयोजित करत नागरिकांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.अनेकदा जनतेला योजनांची माहिती नसते,आणि कागदपत्रांची माहिती लोकांना नसते.त्या काळात भेटीसाठी अधिकारी उपलब्ध होत नाहीत.लोकांचा वेळ आणि पैसा वाया जातो.त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन,गतिमान व्यवस्था होण्यासाठी ही पद्धती चांगली आहे.जनतेच्या दारात जाऊन जनतेच्या माहितीसाठी जावं,ही योजना सरकारने आणली आहे.राणे महसूल मंत्री असताना हा कार्यक्रम होत होता.९ महसूल मंडळ मध्ये हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.तालुका प्रशासकीय कार्यालये लोकांपर्यत जातील.लोकांना लाभ देण्यासाठी कटिबध्द राहतील.
तहसीलदार आर.जे. पवार म्हणाले,आ.नितेश राणे यांच्या मार्गर्शनाखाली हा “शासन आपल्या दारी” व कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला.प्रशासन गतिमान व्हावे आणि नागरिकांना सेवा सुलभ मिळाव्यात यासाठी हा उपक्रम आहे. ज्या अनेक कल्याणकारी योजना आहेत,त्या अनेक लोकांना माहीत नसतात.त्या योजनाचा लाभ कसा घ्यायचा, हे माहीत नसते.या गोष्टीचा विचार करुन शासनाने कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आहे.आ.नितेश राणे यांचे सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे,हे त्याचे कायम वाक्य असते.त्यांचे लोकप्रिय नेतृत्व आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ते वारसा घेऊन काम करत असतात. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला आहे.सर्व विभागामार्फत या ठिकाणी योजनांचा नागरिकांना लाभ होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.

शासनाचे महसूल, पुरवठा, पोलीस,नगरपंचायत,बांधकाम,कृषी, पशुंवर्धन आरोग्य, शिक्षण,आरोग्य,आधार,पंचायत समिती आदींसह सर्वच विभाग व अधिकारी एकाच छत्राखाली उपस्थित होते. त्यामुळे नागरीकांना विविध योजनांची माहिती व १३ हजार ४५६ व पंचायत समिती मार्फत विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक ७५ लोकांना लाभ देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page