नावळे ग्राम पंचायतीने केला गौरव
वैभववाडी प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने नावळे गावातील सौ सुमती कोंडू गुरखे आणि सौ शर्वरी सतिशचंद्र रावराणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशासकीय पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. नावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय रावराणे व माजी सरपंच स्नेहा शेळके यांच्या हस्ते गुरखे रावराणे यांना प्रशासित पत्र सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.सुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, रश्मी गुरव गंगाराम गुरखे, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, मनीषा गुरखे, सुरेश गुरखे, जनार्दन गुरखे, अजय गुरखे, ग्रामसेवक अनिल घुगे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसरपंच रावराणे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सामाजिक क्षेत्रात योगदान देत महिला सक्षमीकरण यासाठी हातभार लावणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे त्यानुसार आज नावळे ग्रामपंचायत मध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले हा पुरस्कार म्हणजे गावातील कर्तुत्वान महिलांना प्रोत्साहन आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक आणि तर आभार संजय शेळके यांनी मानले.
