वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे साजरी करण्यात आली
समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते पांडुरंग काळे, समाज नेते लक्ष्मण शेळके, धनगर समाज नेते शामराव शेळके, प्रभाकर कोकरे सत्यवान शेळके, विजय कोकरे, एसटी वाहक अधिकारी बाबू गुरखे, ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, नापणे माजी ग्रामपंचायत सदस्य बोडेकर, ठेकेदार रामचंद्र बावदाने रमेश शेळके आधी तालुक्यातील धनगर समाज पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाने साजरी केली अहिल्यादेवी होळकर जयंती
