विलवडे धरणातील गाळ उपशाला प्रारंभ…

बांदा/प्रतिनिधी
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज १ जून २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता मा. प्रांताधिकारी श्री प्रशांत पानवेलकर साहेब यांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री रामचंद्र धोत्रे ग्रामपंचायत सरपंच श्री प्रकाश दळवी, भूमी अभिलेख कार्यालय निरीक्षक श्री विनायक ठाकरे, जलसंधारण अधिकारी श्री तुषार यादव, श्री सौरभ आहिरे, मंडळ अधिकारी श्री मालवणकर अशासकीय संस्था म्हणून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल, प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, बाळकृष्ण शेळके, हनुमंत गवस, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ममा. ग्रामसेवक श्री मुकुंद परब, तलाठी श्रीम.अक्षवी भिंगारे, पोलीस पाटील श्री पांडुरंग कांबळे गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देणार आहेत या बाबत माहिती देण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शिवारामध्ये घेऊन जाण्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आली.

You cannot copy content of this page