वैष्णवांच्या मेळ्याने केला विठ्ठल नामाचा गजर
⚡वेंगुर्ला ता.२९-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई व संतमहंतासाहित वेंगुर्ल्यात वैष्णवांचा मेळा अवतरला. या वैष्णवांच्या मेळ्याने ग्रंथदिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला.
⚡वेंगुर्ला ता.२९-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई व संतमहंतासाहित वेंगुर्ल्यात वैष्णवांचा मेळा अवतरला. या वैष्णवांच्या मेळ्याने ग्रंथदिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला.
⚡सावंतवाडी ता.२९-: कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मुक्ताई ॲकेडमीतर्फे एक दिवसाचे मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.2 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.विदयार्थ्यांना बुदधिबळ प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडुचे…
दोन कायमस्वरूपी शिक्षक देण्याची आहे मागणी;शाळेत विद्यार्थी न पाठविण्यावर ठाम राहण्याचा निर्णय मालवण दि (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची जि. प. प्राथमिक शाळेत कायम स्वरूपी दोन शिक्षक द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचे आंदोलन गेले चार दिवस छेडले आहे. आजही पालकांनी शाळेत जमत मुख्याध्यापकांसोबत झालेल्या बैठकीतही ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत तात्पुरत्या शिक्षक…
⚡बांदा ता.२८-: बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विठ्ठल बाळकृष्ण परब (रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून साडे चार लाखाच्या दारुसह गाडी मिळून तब्बल १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बांदा येथे केली.
बांदा/प्रतिनिधीसहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत खुल्या स्वानुभव लेखन (गद्य आणि पद्य) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आयुष्यात आपण जे अनेक अनुभव घेत असतो. त्या कडू-गोड प्रसंगांचे मनावर ठसे उमटत असतात. अनेकदा या भावना व्यक्त करण्यात अनेक अडचणी येत असतात. कधी योग्य वेळ नसते तर कधी योग्य व्यक्ती, कधी हिंमत कमी…
मालवण दि प्रतिनिधीमंगळवारी रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आचरा पारवाडी येथिल दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आज बुधवारी सकाळी आंब्याचे झाड पडून सुमारे सात हजार रुपयाचे नुकसान झाले आहे . परीसरात मंगळवार रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकरी राजा सुखावला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आचरा परीसरात शेती कामे खोळंबली होती.काही शेतकऱ्यांनी पावसाची…
ॲड. एस एस पवार ; वराडकर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मालवण दि प्रतिनिधी गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशामुळे प्रशाला व संस्थेचे नाव उंचावते विद्यार्थ्यांनी यापुढेही चांगला अभ्यास करून उच्चशिक्षित व्हावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्ट्याचे विश्वस्त ऍड एस एस पवार यांनी कट्टा येथे बोलताना केले कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल…
निलेश राणेची कुडाळ तहसीलदाराकडे मागणी मालवण दि प्रतिनिधी मालवण आणि कुडाळ तालुक्यातील सर्व मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झालटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख…
⚡सावंतवाडी ता.२८-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ आणि ‘ईद- उल – अधा’ हे सण मोठ्या जल्लोषात साजरे केले गेले.’ सर्वधर्म समभाव’ ही भावना जोपासणारे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केल्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. आषाढी एकादशी कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता १ ली मधील सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषा परिधान केली. या…
इन्सुली येथील घटना: दोघे जखमी बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटीतील सातजांभळी येथे भरधाव वेगात क्रेटा मोटार झाडाला धडकून अपघातग्रस्त झाली. यां अपघातात खुशबू ठाकूर (वय ३४) व तिचा मुलगा आर्यन पायरे (वय ४) हे दोघे जखमी झालेत. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. इन्सुली येथील रिक्षाचालक अनिल नार्वेकर, माजी जि. प शिक्षण सभापती गुरुनाथ…