ॲड. एस एस पवार ; वराडकर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मालवण दि प्रतिनिधी
गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशामुळे प्रशाला व संस्थेचे नाव उंचावते विद्यार्थ्यांनी यापुढेही चांगला अभ्यास करून उच्चशिक्षित व्हावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्ट्याचे विश्वस्त ऍड एस एस पवार यांनी कट्टा येथे बोलताना केले
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा तसेच वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संस्था अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धिविनायक सभागृहात संपन्न झाला
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था विश्वस्त एस एस पवार उपाध्यक्ष चे आनंद वराडकर सचिव श्री सुनील नाईक सचिव श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार श्री रवींद्र पावसकर शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर संचालक श्री महेश वाईकर संचालिका सौ स्वाती वराडकर वराडकर हायस्कूल कट्ट्याचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री ऋषिकेश नाईक पर्यवेक्षिका सौ देवयानी गावडे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
