बांदा/प्रतिनिधी
सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत खुल्या स्वानुभव लेखन (गद्य आणि पद्य) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या आयुष्यात आपण जे अनेक अनुभव घेत असतो. त्या कडू-गोड प्रसंगांचे मनावर ठसे उमटत असतात. अनेकदा या भावना व्यक्त करण्यात अनेक अडचणी येत असतात. कधी योग्य वेळ नसते तर कधी योग्य व्यक्ती, कधी हिंमत कमी पडते तर कधी व्यक्त होणे सुरक्षित वाटत नाही. भावना सकारात्मक असो वा नकारात्मक त्या व्यक्त करणे आवश्यक आणि महत्त्वाचे असते. यासाठीच संस्थेच्या वतीने यां आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी आपल्या लेखनामध्ये भावना जाणवल्या त्या प्रसंगाचे वर्णन थोडक्यात, कोणकोणत्या भावना जाणवल्या (वेगवेगळ्या छटांसहित), त्या भावना व्यक्त करता आल्या का? कोणापाशी आणि कशा व्यक्त केल्या?, भावना व्यक्त करता आल्या नसतील तर त्याची कारणं, त्या प्रसंगाचा एकंदर जीवनावर काय परिणाम झाला?, आत्ता तो प्रसंग आठवताना कोणकोणत्या भावना जाणवतात? यां सर्व मुद्द्याचा समावेश करावा.
स्पर्धेसाठी इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १२ वी, १८ ते २५ वर्षे व २५ वर्षांपुढील खुला असे चार गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी स्वानुभव लेखन कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेले असावे. स्वानुभव लेखन, कविता यांच्या खाली खालील माहिती द्यावी. अन्यथा साहित्य स्वीकारले जाणार नाही. स्पर्धकाचे नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सह), जन्मदिनांक, वय, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, स्पर्धकाची स्वाक्षरी, शाळेचे / कॉलेजचे नाव (केवळ पहिल्या तीन गटांना लागू) यां अनुक्रमाकानुसार माहिती द्यावी. साहित्य पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी साहित्य sahajtrust@gmail.com या ईमेलवर किंवा सहज ट्रस्ट, मन्नत बंगला, करोल वाडा, जुना बाजार, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, पिन : ४१६५१० यां पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी मो. 9420880529 संपर्क साधण्याचे आवाहन सहज ट्रस्टच्या वतीने मीनाक्षी यांनी केले आहे.
