इन्सुली येथील घटना: दोघे जखमी
बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटीतील सातजांभळी येथे भरधाव वेगात क्रेटा मोटार झाडाला धडकून अपघातग्रस्त झाली. यां अपघातात खुशबू ठाकूर (वय ३४) व तिचा मुलगा आर्यन पायरे (वय ४) हे दोघे जखमी झालेत.
ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. इन्सुली येथील रिक्षाचालक अनिल नार्वेकर, माजी जि. प शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी जखमींना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु तेथे उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जखमीना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. खुशबू ठाकूर व तिचा मुलगा मोटारीने मुंबईहून गोव्याला जात होते. मोटार चालकाचे भरधावं वेगात मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीने रस्त्यालगत सात जांभळीला जोरदार धडक दिली.
फोटो :-
इन्सुली घाटीत अपघातग्रस्त झालेली मोटार. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
