दुचकीस्वारांवर आचरा ठाण्यात गून्हा दाखल
⚡मालवण ता.२८-: वायंगणी तेथे आचरा मालवण रस्त्यावर हायस्कूल नजिक रस्त्याने पायी चालत जात असलेल्या चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वाराने पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ सुमारास घडली. याअपघात प्रकरणी दुचाकीस्वार ऋषिकेश गुरुनाथ दुखंडे (वय २१ )रा वायंगणी दुखंडेवाडी याच्यावर आचरे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहतीनूसार फिर्याद देणाऱ्या सविता सदानंद राणे यांच्यासह राजु गवाणकर, पांडुरंग जोशी, दत्तराम सावंत हे गावातील एक कार्यक्रम आटोपून आचरा मालवण रस्त्याने चालत घरी जात असताना मागुन आलेल्या दुचाकीस्वारांने जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर सर्वजण बाजूला फेकले गेले या अपघातात राजू गवाणकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर इतरांना किरकोळ दुखापती झाल्या. गंभीर जखमी गवाणकर यांना अधिक उपचरासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीस्वार ऋषिकेश गुरुनाथ दुखंडे याच्यावर आचरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बबन पडवळ करत आहेत.
