Headlines

Global Maharashtra Breaking News

विशाल परब यांनी घेतले आरवली वेतोबा देवाचे दर्शन

⚡सावंतवाडी ता.२९-: आषाढी एकादशी निमित्त भाजप युवा नेते तथा विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक विशाल परब यांनी आज आरवली येथील श्री देव वेतोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Read More

प्रसाद कुलकर्णी यांची ‘आनंदयात्रा’ कणकवलीत

⚡कणकवली ता.२९-: नागपूरपासून सिंगापूरपर्यंत आणि मुंबईपासून दुबईपर्यंत गाजत असलेला प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा धमाल एकपात्री कार्यक्रम येत्या शनिवारी कणकवलीत होणार आहे. श्रुतिसुखद कवितांची रिमझिम, पोट धरुन हसवणाऱ्या किश्श्यांचा पाऊस आणि त्या जोडीने आयुष्य जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असे स्वरूप असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. निलायम द ब्ल्यू बॉक्स, हळवल येथे शनिवार,१ जुलै २०२३…

Read More

चढणीचे मासे पकडण्यासाठी सगळीकडे धावपळ

खवळे, काडी, मरल, चिंगुळ, डेमके व ठिगुर शेतात : परिसरात बेडुकांचा डराव…डराव… आवाज ⚡बांदा ता.२९-: मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. चढणीचे मासे धरण्यासाठी युवक वर्ग मोठ्या प्रमाणात नदी, ओढे व शेळजमिनीच्या (पाणथळ) ठिकाणी पहायला मिळत आहेत. खवळे, काडी, मरल, चिंगुळ, डेमके व ठिगुर यासारखे मासे पहिल्या पावसात शेतात चढले. मिळेल त्या साहित्याने मासे…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत दीपा आरोसकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२९-: आकार फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने तुळस येथे जैतीर विद्यालयात समता आणि बंधुता याची शिकवण देणा-या, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाया ‘लोककल्याणकारी‘ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Read More

कुडाळ येथे प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

⚡कुडाळ ता.२९-: कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली व कुडाळदेशस्थ विद्यावृद्धी समाज, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा – २०२३” हा कार्यक्रम मराठा मंदिर हॉल, कुडाळ येथे पार पडला. कु. स्वरांगी खानोलकर हिच्या सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर श्रीमती विनया सामंत यांनी प्रास्ताविक केले. यावर्षी प्रेरणा परिषदेत प्रा. विद्याधर…

Read More

वैष्णवांच्या मेळ्याने केला विठ्ठल नामाचा गजर

⚡वेंगुर्ला ता.२९-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई व संतमहंतासाहित वेंगुर्ल्यात वैष्णवांचा मेळा अवतरला. या वैष्णवांच्या मेळ्याने ग्रंथदिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला.

Read More

कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

⚡सावंतवाडी ता.२९-: कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मुक्ताई ॲकेडमीतर्फे एक दिवसाचे मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.2 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.विदयार्थ्यांना बुदधिबळ प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडुचे…

Read More

तोंडवळी ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम

दोन कायमस्वरूपी शिक्षक देण्याची आहे मागणी;शाळेत विद्यार्थी न पाठविण्यावर ठाम राहण्याचा निर्णय मालवण दि (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची जि. प. प्राथमिक शाळेत कायम स्वरूपी दोन शिक्षक द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचे आंदोलन गेले चार दिवस छेडले आहे. आजही पालकांनी शाळेत जमत मुख्याध्यापकांसोबत झालेल्या बैठकीतही ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत तात्पुरत्या शिक्षक…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

⚡बांदा ता.२८-: बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विठ्ठल बाळकृष्ण परब (रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून साडे चार लाखाच्या दारुसह गाडी मिळून तब्बल १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बांदा येथे केली.

Read More

सहज ट्रस्ट तर्फे खुल्या स्वानुभव लेखन स्पर्धेचे आयोजन

बांदा/प्रतिनिधीसहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत खुल्या स्वानुभव लेखन (गद्य आणि पद्य) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आयुष्यात आपण जे अनेक अनुभव घेत असतो. त्या कडू-गोड प्रसंगांचे मनावर ठसे उमटत असतात. अनेकदा या भावना व्यक्त करण्यात अनेक अडचणी येत असतात. कधी योग्य वेळ नसते तर कधी योग्य व्यक्ती, कधी हिंमत कमी…

Read More
You cannot copy content of this page