माजगाव ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम संपन्न..
⚡सावंतवाडी ता.११-: मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत आज माजगांव मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले,शिलाफलक अनावरण त्यानंतर पंचप्रण शपथ ,७५ देशी वृक्ष लागवड करण्यात आली.दरम्यान शहीद जवान, माजी सैनिक, निवृत पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी तहसीलदार उपस्थित होते यावेळी युवकांना स्पर्धा परीक्षा व सैन्य भरती साठी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे वृक्षलागवड व घनकचरा व्यवस्थापनासाठी माजगांव ग्रामपंचायत ला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर डॉ अर्चना सावंत सरपंच माजगांव, रेश्मा सावंत, विकास सावंत, अशोक दळवी, चंद्रकांत कासार,बाळा वेजरे, संजय कानसे आदी उपस्थित होते.यावेळी माजगांव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
