‘संविता आश्रम’ मधील निराधार बांधवांसाठी वस्तू आणि आर्थिक मदत.
मालवण (प्रतिनिधी)
जीवन आनंद संस्था संचलित ‘संविता आश्रम पणदूर’ येथे सध्या सुमारे २०० निराधार बांधवांना आधार देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम दीर्घकाळ सुरु असून त्यांच्या मदतीसाठी संविता आश्रमचा “एक हात मदतीचा ” हा कार्यक्रम माळगाव येथील ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ यांनी जीवनावश्यक वस्तु आश्रमातील निराधार बांधवांना भेट म्हणुन दिले. तसेच यावेळी आर्थिक मदतही जमा झाली.
या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक यु. वाय. जोशी यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण भोगले, संस्थेचे खजिनदार महादेव सुर्वे, प्रमुख पाहुणे एम.जी. कामत, अक्षय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेतील शिक्षक कर्मचारी श्री. टी. बी. गिरी यांनी केले
यावेळी श्री. कामत यांनी समाजात घडणारे वास्तव व त्याची भयानकता आपल्या मनोगतात मांडली यावेळी आर.के. बेनके, एस.व्ही. जाधव, एस.आर. मिसाळ, ए.एस. नांदगावकर, आर.एन. राणे आदी उपस्थित होते शेवटी शिक्षिका सौ. एस. व्ही. जाधव यांनी आभार मानले.
