सैनिकांना कुटुंबाच्या आठवणीसाठी उसंत मिळत नाही…

सेवानिवृत्त सैनिक निलेश भोसले सचिन पुजारी यांनी रामेश्वर वाचन मंदिरात व्यक्त केल्या भावना

मालवण (प्रतिनिधी)

देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक हे देश हेच आपले कुटुंब मानून काम करत असतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आठवणीत व्याकूळ होण्यासाठी सैनिकांना उसंतच मिळत नाही, असे मत आचरा देवूळवाडी येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त सैनिक निलेश भोसले, सचिन पुजारे यांनी रामेश्वर वाचन मंदिरात व्यक्त केले.

आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश’ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन, पंचप्रण शपथ इ. कार्यक्रम संपन्न झाले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सैनिक भोसले आणि पुजारे यांच्या हस्ते केले गेले. यावेळी आपले अनुभव कथन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डकर, सदस्य सौ.उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परूळेकर, भिकाजी कदम, दिपाली कावले, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी यांसह कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमाचे महत्व विशद केले. यावेळी आचरे गावातील निलेश भोसले व सचिन पुजारे या दोन माजी सैनिकांचा ज्ञानेश्वरी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी उपस्थित माजी सैनिकांची मुलाखत घेऊन त्यांचे थरारक प्रसंग उपस्थितांना ऐकविले. क्रांतिदिनाचे महत्वही कांबळी यांनी विशद केले. सदस्या सौ. उर्मिला सांबारी यांनी क्रांतिकारक कै.नारायण सांबारी (त्यांचे वडील ) यांचे काही थरारक प्रसंग कथन केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी यांनी केले. अर्जुन बापर्डेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page