Headlines

Global Maharashtra Breaking News

वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही नगरपालिकांना ‘वैकुंठ रथ’ देणार..

विशाल परब यांची घोषणा; ग्रामीण भागातील शववाहिनी अभावी होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: ग्रामीण भागात शववाहिनी उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी अनेकदा नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शववाहिनी उपलब्ध न झाल्यास अन्य वाहनांची व्यवस्था करावी लागते आणि त्यासाठी नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त…

Read Full News

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत सिंधुदुर्ग केंद्राचा ५३ टक्के निकाल

गौरी केळुसकर प्रथम, वृषाली कोळसुलकर द्वितीय, तर दीपिका गाणार तृतीय कुडाळ : महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२६ च्या जून महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत कुडाळ येथील सिंधुदुर्ग केंद्राचा ५३ टक्के निकाल लागला आहे. रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे आयोजित या केंद्रातून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी…

Read Full News

सिंधुदुर्गातील दुष्काळी परिस्थितीत तातडीने पंचनामे करा…

आशिष सुभेदार यांची मागणी; अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलनाचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाचा छायेत आहे तर आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती जाहीर झाली असून शासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात तसेच खरिप हंगाम पिक, भातशेती, बागायती यांच्या झालेल्या नुकसानिचे त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना…

Read Full News

‘बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा..

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० हून अधिक कच्चे बंधारे; महाआरोग्य शिबिरांचाही महासंकल्प: पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡सावंतवाडी, ता. १-: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाचा’ पुढील टप्पा म्हणून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध समाजोपयोगी…

Read Full News

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ घ्यावा…

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे माजगाव येथे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून यामध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट ठेवली गेलेली नाही. त्यामुळे सावंतवाडीतील जास्तीत जास्त ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा;…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या आंबोली, माडखोल व कोलगाव जि.प. विभागाची जबाबदारी सोनाली परब यांच्यावर..

⚡सावंतवाडी, ता.०१-: सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या आंबोली, माडखोल व कोलगाव या तीन जिल्हा परिषद विभागांसाठी महिला तालुका प्रमुखपदी सौ. सोनाली देविदास परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुष्मिता जाधव यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सौ. अर्चना पांगम, सौ. उत्कर्षा गावकर, सौ. प्रणाली…

Read Full News

ओंकार हत्तीला वनतारात पाठवा…

पालकमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा:माजी जि.प. सभापती मंगेश तळवणेकर यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीचे होत असलेले हाल पाहून दुःख होत असून, ओंकार हा आमच्यासाठी दैवतासमान आहे. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे वनतारात पाठविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे…

Read Full News

वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट कुडाळ : वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारींसंदर्भात कवठी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध तक्रारी मांडत सविस्तर चर्चा केली.स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारींसह ग्रामस्थांनी आपल्या शंकांचे निरसन करण्याची…

Read Full News

पुष्पसेन ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात संपन्न

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत ६० उमेदवारांचा सहभाग कुडाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय व नर्सिंग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत रोजगार महामेळाव्याचे आयोजन पुष्पसेन ज्ञानपीठ येथे करण्यात आले.बया मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र परब, गीता काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक…

Read Full News

भाजपची आज सायंकाळी तातडीची बैठक..

भाजप जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी पाच वाजता बैठक: तर साडेपाच वाजता पत्रकार परिषद.. ⚡सावंतवाडी ता. ०१-: सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर…

Read Full News

You cannot copy content of this page