Headlines

Global Maharashtra Breaking News

सी ए च्या परीक्षेत तळकट मधील सुमित सडेकरचे यश…

⚡दोडामार्ग ता.१९-: (ता. दोडामार्ग)येथील सुमित प्रभाकर सडेकर सी.ए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. बेताची परिस्थिती असताना त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. तळकट येथील प्रभाकर सडेकर यांचा सुमित मुलगा. सुमित याचे वडील मजुरीचे काम करतात तर आई गृहिणी आहे .घरची परिस्थिती बेताची असताना सुमित याने आपले ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घेतली. कोलझर…

Read Full News

बांदा शहरात डांबराच्या पिंपना आग…

सायंकाळची घटना:सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात डांबराच्या पिंपना आग लागल्याची घटना घडली. एक हजार लिटर पिंप बांदा शहरातील रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आली होती. सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु…

Read Full News

मालवणात ठाकरे शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

बाळासाहेब ठाकरे जयंतीचे औचित्य ; ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. ⚡मालवण ता.१९-: हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिराला ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Read Full News

मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी सावंतवाडी मराठा समाज मुंबईत रवाना होणार…

सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय:सिताराम गावडे करणार नेतृत्व.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या 26 जानेवारीला ते मोठे आंदोलन मुंबई येथे करणार आहेत. दरम्यान जरांगे पाटलांच्या या लढ्याला यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका मराठा समाज मुंबई येथे रवाना होणार असून मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईत…

Read Full News

मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून दिव्यांग मुलांना केले ब्लँकेट वाटप…

बांदा/प्रतिनिधीचिपळूण येथील रोट्रॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून आरती निराधार सेवा फौंडेशन (दिव्यांग मुलांचे उद्योगकेंद्र ) येथील मालघर गुरुकुल प्रशाळेतील २१ निराधार व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील ग्रुपने असे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ग्रुपच्या सदस्यांनी…

Read Full News

भूमिका मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

राम मंदिर प्रतिष्ठापनाचे निमित्त.. बांदा/प्रतिनिधीश्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून सोमवार दिनांक २२ रोजी श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदा ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १० लघुरुद्र आणि अभिषेक, ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत भव्य रथयात्रा, ११ ते ११.१५ घंटा नाद, ११.१५ ते १२.३० रामजप आणि रामरक्षा…

Read Full News

बांदा ग्रामस्थांच्या लढयाला यश…

मोबाईल टॉवरला नविन बॅटरी बसवल्या:26 जानेवारीचे “भीक मांगो” आंदोलन घेतले मागे.. ⚡बांदा ता.१९-: भारत दूरसंचार निगमच्या बांदा येथील मोबाईल टॉवरला वीज गेल्यावर बॅटरी बॅकअप नसल्याने लगेचच टॉवर बंद होत होता. त्यामुळे बांदा ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग तसेच व्यापारी व खरेदी करता आलेल्या पंचक्रोशीतील लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सध्याच्या काळात सर्व गोष्टी या ऑनलाइन…

Read Full News

शनिवारी बांद्यात श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन…

⚡बांदा ता.१९-: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट यांच्यावतीने आयोजित प्रतिवार्षिक श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शनिवार दि.20 जानेवारी रोजी बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात आगमन होणार आहे.सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी दर्शनासाठी थांबणार असून नंतर पुढे घारपी येथे मार्गस्थ होणार आहे.सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

रोहा कोकण कृषी विद्यापीठ संशोधक डॉ. जितेंद्र कदम यांची न मालवण नगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट…

⚡मालवण ता.१९-:रोहा कोकण कृषी विद्यापीठ संशोधक डॉ. जितेंद्र कदम यांनी नुकतीच मालवण नगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मान्यवरांचे स्वागत करून पालिकेतर्फे सन्मान केला. डॉ. कदम यांनी हळदीचे संशोधन करून पेटंट मिळविणे, श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन व मानांकन, अलिबाग येथील प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक संकेत (Geographical Indication) जीआय मानांकन मान्यता मिळविणे…

Read Full News

मिलाग्रिस प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१९-: १६ रोजी फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून मिलाग्रिस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी च्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युअल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे”हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ.अर्चना घारे( सावंतवाडी विधानसभा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),रेव्ह.फादर ॲन्ड्रु डिमेलो, रेव्ह.फादर मिलेट डिसोझा ( मॅनेजर), फादर फिलिप, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका…

Read Full News

You cannot copy content of this page