राम मंदिर प्रतिष्ठापनाचे निमित्त..
बांदा/प्रतिनिधी
श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून सोमवार दिनांक २२ रोजी श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदा ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते १० लघुरुद्र आणि अभिषेक, ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत भव्य रथयात्रा, ११ ते ११.१५ घंटा नाद, ११.१५ ते १२.३० रामजप आणि रामरक्षा पठण, ११.४५ वाजता सामुदायिक गाऱ्हाणे, १२.३० वाजता आरती, १ ते ३ महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते ८ बांदा महिला मंडळ प्रासादिक भजन, ६.३० ते ८.३० वाजता गायन, रात्रौ ९ नंतर बांदेश्वर पालखी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.
या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ यांचेकडून करण्यात आले आहे.
