बांदा शहरात डांबराच्या पिंपना आग…

सायंकाळची घटना:सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात डांबराच्या पिंपना आग लागल्याची घटना घडली. एक हजार लिटर पिंप बांदा शहरातील रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आली होती. सुदैवाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. आज या रस्त्यावर डांबराचा कार्पेट टाकण्यात येणार होता. यासाठी ठेकेदार यांनी १ हजार लिटरचे डांबराचे २ पिंप आणले होते. सध्या याठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. आज सायंकाळी डांबर टाकण्यासाठी कामगारांनी डांबराच्या पिंपाची गाडी रस्त्याच्या नजिकच पार्क केली होती. डांबर वितळविण्यासाठी कामगारांनी आगीचा जाळ केला होता. सुमारे तासभर डांबर वितळविणे सुरु होते.

You cannot copy content of this page