Headlines

Global Maharashtra Breaking News

‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.२७-: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृहिता महिला संस्थेतर्फे रविवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कॅम्प भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सब सदाशिव मंदिरानजिक महिलांसाठी ‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

Read Full News

मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२७-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमामध्ये प्राथमिक शाळांमधून शाळा मठ नं.२ ने व माध्यमिक शाळांमधून गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडाने प्रथम क्रमांक मिळविला.

Read Full News

ज्येष्ठ नागरिकांचा संघाचा मेळावा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२७-: ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ला या संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा ११ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदाने जगा. अध्यात्मक आनंद सुचविते. आपल्या दुःखाचे कारण आपला अहंकार असून तो सोडून परमार्थाकडे वळा असे आवाहन प्रमुख पाहुणे बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले.

Read Full News

कुडाळ येथे मनसेचा बालमहोत्सव उत्साहात संपन्न…

⚡कुडाळ ता.२७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2024 दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण भवन, एमआयडीसी येथे संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष सावंत कोकण नेते मनसे , प्रदीप माने उद्योजक, शशांक आटक शिक्षक प्रतिनिधी, नितीन शिरसाट उद्योजक , शशांक पिंगुळकर ग्रामपंचायत सदस्य, गुरुदास…

Read Full News

माय मराठीचे संवर्धन करा…

कोमसाप सावंतवाडी शाखेची आर्त हाक:विविध बँका, सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्राची मायबोली अर्थात मराठीचे विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संवर्धन व्हावे, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने पुढाकार घेतला आहे. आज राजभाषा दिनानिमित्त कोमसाप, सावंतवाडी शाखेद्वारा सावंतवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडिया शाखा…

Read Full News

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार…

संदीप पेडणेकर:तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न… ⚡वेंगुर्ले ता.२७-: सावंतवाडी मतदार संघामध्ये बरीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी विधानसभा निवडणूक घड्याळ चीन्हवरच लढविणार, असा दावा वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी बैठकीत केला.

Read Full News

शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये असलेल्या शिशुविहार- काळे आजींची बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी विविध गाण्यांवर सादर केलेली नृत्ये सर्वांची वाहवा मिळवून गेली. या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ स्व. काळे आजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे व इतर…

Read Full News

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत प्राथमिक गटात मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम…

तर माध्यमिक गटात कट्टा येथील वराडकर हायस्कुल प्रथम: सर्वस्तरातून होतय कौतुक.. ⚡मालवण ता.२६-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळांमध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेने तर खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कुलने प्रथम…

Read Full News

डंपरमधून रस्त्यावर पडलेल्या वाळूवर मोटारसायकल घसरल्या…

वाळूमुळे एखादा मोठा अपघात घडला तर जबाबदार कोण..?वाहनचालकांचा सवाल… ⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यात बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक राजरोसपणे सुरु असून चौके येथील सिंधुदुर्ग बँक समोरील रस्त्यावर डंपर मधील वाळू पडल्याने शनिवारी रात्री उशिरा मालवण चौके असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरा रस्त्यावर पडलेली वाळू दिसत…

Read Full News

तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरश दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ आक्रमक…

रास्ता रोको केले आंदोलन: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. सर्वगोड यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित.. ⚡मालवण ता.२६-: तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून याबाबत शासन दरबारी वारंवार लक्ष वेधूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त बनलेल्या तोंडवळी ग्रामस्थांनी आज आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढत मालवण आचरा रस्त्यावर तोंडावळी फाटा येथे रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको करत…

Read Full News

You cannot copy content of this page