सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार…

संदीप पेडणेकर:तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न…

⚡वेंगुर्ले ता.२७-: सावंतवाडी मतदार संघामध्ये बरीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी विधानसभा निवडणूक घड्याळ चीन्हवरच लढविणार, असा दावा वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी बैठकीत केला.

वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारिणी बैठक आज संदीप पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले कॅम्प येथे संपन्न झाली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब ,तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी ,जिल्हा सचिव सुशील चमणकर,शहर अध्यक्ष सूरज परब, सरचिटणीस संतोष राऊळ, संदीप सातार्डेकर , सदस्य सुभाष तांडेल ,सॅमसन फर्नांडिस, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र आमरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप , शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आदी तीन पक्षांचे महायुतीचे सरकार असून सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये बरीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविली आहे. मंत्री दिपक केसरकर , सुरेश दळवी , बबन साळगावकर आदींनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढविली असून आगामी विधानसभेसाठी सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा , अशी आमची मागणी आहे , असे संदीप पेडणेकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी शहरासह संपूर्ण तालुक्यात संघटना बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली .आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वांनी जोमाने काम करण्याचे ठरविण्यात आले.
You cannot copy content of this page