डंपरमधून रस्त्यावर पडलेल्या वाळूवर मोटारसायकल घसरल्या…

वाळूमुळे एखादा मोठा अपघात घडला तर जबाबदार कोण..?वाहनचालकांचा सवाल…

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यात बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक राजरोसपणे सुरु असून चौके येथील सिंधुदुर्ग बँक समोरील रस्त्यावर डंपर मधील वाळू पडल्याने शनिवारी रात्री उशिरा मालवण चौके असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरा रस्त्यावर पडलेली वाळू दिसत नसल्याने काही मोटारसायकल स्लिप होऊन मोटारसायकल स्वार रस्त्यावर पडून जखमी झाल्याची घटना देखील घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे कोळंब येथील रस्त्यावर देखील डंपर मधील वाळू रस्त्यावर पडून मोटारसायकलस्वार या वाळूचा अंदाज न आल्याने रस्त्यावर कोसळले होते. यावेळी कोळंब येथील नागरिकांनी या डंपर चालकांचा पाठलाग करून त्यांना चांगलाच चोप देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता चौके येथील रस्त्यावरही डंपर मधील वाळू पडून त्यावर मोटरसायकल घसरल्याच्या घटना घडल्या. या वाळूमुळे एखादा मोठा अपघात घडला तर या अपघाताला जबाबदार कोण असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे. बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सुसाट डंपरवर महसूल विभागासह पोलीस प्रशासन कारवाई करेल का अशी चर्चा सुरु झाली आहे.

You cannot copy content of this page