⚡वेंगुर्ला ता.२७-: ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ला या संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा ११ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदाने जगा. अध्यात्मक आनंद सुचविते. आपल्या दुःखाचे कारण आपला अहंकार असून तो सोडून परमार्थाकडे वळा असे आवाहन प्रमुख पाहुणे बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले.
यावेळी उपस्थित असलेले डॉ.सचिन परूळकर, संघाचे माजी अध्यक्ष रा.पां.जोशी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तावित रमेश पिगुळकर यांनी, पाहुण्यांचा परिचय शामराव काळे, सूत्रसंचालन विद्याधर कडुलकर तर आभार जगदीश तिरपुडे यांनी मानले.
