‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.२७-: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृहिता महिला संस्थेतर्फे रविवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कॅम्प भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सब सदाशिव मंदिरानजिक महिलांसाठी ‘खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा‘ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

  यामध्ये फनी गेम्स, ऑन द स्पॉट गेम्स, मनोरंजन, महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थांवर खुली पाककला स्पर्धा होणार असून यातील प्रथम तीन विजेत्यांना २५००, १५००, १००० अशी पारितोषिके तसेच सॅलेड डेकोरेशन स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना १५००, १००० व ७०० अशी पारितोषिके दिली जाणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी १ मार्चपर्यंत ७५८८६६६४२४, ९०४९३१६८०० किवा ९४२०७४२२४८ यांच्याकडे करावी.
You cannot copy content of this page