Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत हनुमान जयंती उत्सव निमित्त राजन तेली यांनी चार मंदिरात घेतले दर्शन…

सावंतवाडी ता.२३-: शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त शहरातील प्रत्येक मंदिरात सुद्धा भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शहरातील चार मंदिरात जाऊन दर्शन घेतल. शहरात अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.

Read Full News

चराठा येथील भाविक अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी रवाना…

युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य: ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहे. यावेळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी प्रवासाचा शुभारंभ केला. दरम्यान स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा…

Read Full News

आनंदव्हाळ येथील गोपाळकृष्ण मंदिराचा १ रोजी कलशारोहण सोहळा…

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा कलशारोहण समारंभ दि. १ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सायं. ३.३० वा. श्री गिरोबा मंदिर, नांदरुख (चौकेमार्गे) ते श्री गोपाळकृष्ण मंदिर, आनंदव्हाळ अशी कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि….

Read Full News

वडील ओरडल्याच्या रागातून बांदा येथील दोन शाळकरी भाऊ बेपत्ता….

⚡बांदा ता.२२-: वडील ओरडल्याच्या रागातून दोन शाळकरी भाऊ घर सोडून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वडिलांनी बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे.मोठा मुलगा सिंगनिया कुमार (वय १६) व त्याचा लहान भाऊ हसमुख कुमार (वय १४) अशी बेपत्ता झालेल्या भावांडांची नावे आहेत. याबाबत वडील बाबुराव चौहान यांनी तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read Full News

जर्मनीच्या शिष्टमंडळाची नारायण राणे यांच्याशी चर्चा…

इंजिनिअरींग काॅलेज येथे होणार सेंटर ऑफ एक्सेलन्स.. ⚡कणकवली ता.२२-: जर्मनीच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची अोम गणेश या निवास्थानी भेट घेतली. त्याप्रमाणे शिष्टमंडळाने अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे भेट दिली. भेटीदरम्यान, महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सेलन्स स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. नशिब इसुफाज, रोलांड हास, पौलिना जोवरस्का, अँडरास रिफस्टेक, बस्टियन मुल्लर, हेराल्ड कुंझेंडॉर्फ, कविता सन्यासी…

Read Full News

शेर्पेत घरफोडी, ८,५०० रुपयांची रोकड लंपास…

⚡कणकवली ता.२२-: शेर्पे मुस्लिमवाडी येथे घरफोडी करून चोरट्याने ८,५०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रविवारी २१ रोजी रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शरफुद्दिन अब्दुल लतीफ जैतापकर (६० रा. शर्पे- मुस्लिमवाडी) हे रविवारी रात्री नातेवाईकाच्या मुलीची हळद असल्याने घराला कुलूप लावून ते कुटुंबीयांना घेऊन त्यांच्या…

Read Full News

वसुंधरा दिनानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण…

ओरोस ता.२२-: जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली असून झाडे लावा! झाडे जगवा! देश वाचवा! हा संदेश न्यायाधीश श्री गायकवाड यांनी या प्रसंगी दिला. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा…

Read Full News

रेडी पोर्टमध्ये खा राऊत यांचा थेट संबंध…

भाजप नेते निलेश राणे यांचा गंभीर आरोप:मुलगा गितेश, भाचा शैलेश यांचा सीईओ पाल यांच्या समवेत असलेला फोटो केला सादर.. ओरोस ता २२खा विनायक राऊत यांचा मायनिंग आणि रेडी पोर्ट याच्याशी थेट संबंध असल्याचा आरोप करीत भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी रेडी पोर्ट येथे रेडी पोर्ट अधिकारी आणि त्यांचा मुलगा गितेश तसेच भाचा शैलेश…

Read Full News

जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेत नाराजी…

प्रचाराबाबत वरिष्ठ नेत्यांचे आदेश नाहीत:ब्रिगेडियर सुधीर सावंत.. सिंधुदुर्गनगरी ता २२रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने यावेळी या मतदार संघात सेनेचाच उमेदवार असेल अशी आशा होती. मात्र ही जागा भाजपा कडे गेल्याने जिल्ह्यातील शिवसेना( शिंदेगट) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच आपल्या पक्षाचा वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराबाबत अद्याप कोणतेही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण…

Read Full News

योग्य वेळी – योग्य जोखीम हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली…

युवराज लखमराजे खेमसावंत-भोंसले: भोंसले फार्मसी महाविद्यालयातपाचवा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२२-: एप्रिल २०२४ रोजी यशवंतराव भोंसले फार्मसी महाविद्यालयात पाचवा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न झाला. या समारंभात २०१९-२०२३ या तुकडीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आल्या, प्रमुख पाहुणे या नात्याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज श्रीमंत लखमराजे खेम सावंत-भोंसले, मुंबई विद्यापीठाचे…

Read Full News

You cannot copy content of this page