Headlines

जर्मनीच्या शिष्टमंडळाची नारायण राणे यांच्याशी चर्चा…

इंजिनिअरींग काॅलेज येथे होणार सेंटर ऑफ एक्सेलन्स..

⚡कणकवली ता.२२-: जर्मनीच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची अोम गणेश या निवास्थानी भेट घेतली. त्याप्रमाणे शिष्टमंडळाने अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे भेट दिली. भेटीदरम्यान, महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सेलन्स स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. नशिब इसुफाज, रोलांड हास, पौलिना जोवरस्का, अँडरास रिफस्टेक, बस्टियन मुल्लर, हेराल्ड कुंझेंडॉर्फ, कविता सन्यासी राव, ओमकार कलवडे, संतोष देशपांडे, सूरज परब, प्रसन्न शिरोडकर यांचा समावेश होता. या सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना जर्मनी येथे कायम स्वरुपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याकरिता लागणाऱ्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुद्धा या सेंटरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
शिष्टमंडळातील सदस्यांचे एसएसपीएम संस्थेचे संस्थापक तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे, अध्यक्षा नीलम राणे, उपाध्यक्ष नीलेश राणे, सचिव नीतेश राणे, प्राचार्य, डॉ. डी. एस. बाडकर, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत व अभिनंदन केले.

You cannot copy content of this page