Headlines

Global Maharashtra Breaking News

कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ भीषण अपघात…

युवतीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर जखमी.. सावंतवाडी : कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकीत भीषण अपघात झाला. यात एक युवती जागीच ठार झाली. तर युवक गंभीर जखमी झाला आहे. समोरील स्वीफ्ट चालकाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याबाबत चौकशी केली जात आहे. कोलगाव येथील मियासाब समाधीजवळ हा अपघात झाला. दुचाकी ( जीए. ०३ एबी….

Read Full News

भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील सौ रश्मी लुडबे यांची नियुक्ती

मालवण दि प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील भाजपाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला मोर्चा प्रदेश सदस्या सौ रश्मी लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी सौ लुडबे यांना दिले आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेल्या पत्रात…

Read Full News

विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरचीवाडी येथै आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…!

मालवण दि प्रतिनिधीआषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे शनिवार, दि.२५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा.- श्री. मंगेश आत्माराम साईल, सहाय्यक आयुक्त राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व सेवाकर भवन, वांद्रे (पुर्व) यांच्या हस्ते शासकीय महापूजा, सकाळी १० ते १२ वा. जुने…

Read Full News

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी गटार बांधकामांची केली पाहाणी

मालवण दि प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरातील मेढा भागात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कुल कॉर्नर पर्यत गटार बांधकाम सुरु आहे. यांसह गटार बांधकामांची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी करीत दर्जेदार कामालाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे अश्या सूचना त्यांनी केल्या. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहाराच्या सर्वांगीण आणि…

Read Full News

बांदा श्री विठ्ठल मंदिरात शनिवारी आषाढी एकादशी सोहळा…

⚡बांदा ता.२४-: बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात सात दिवस सुरू असलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची शुक्रवारी दुपारी ठिक 12 वाजता सांगता झाली. शनिवार दि. 25 जुलै रोजी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.शनिवारी पहाटे 5 वाजता काकड आरती होईल. त्यानंतर दर्शनास सुरूवात होईल. या सोहळ्यानिमित्त विविध दिंड्यांचे आगमन होईल. सायंकाळी 7 वा. सायं आरती तर रात्री…

Read Full News

जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेचे घवघवीत यश…

⚡बांदा ता.२४-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. सदर स्पर्धा ओरोस, क्रीडा संकुल येथे संपन्न झाली.70 ते 75 किलो वजनी गटात अवनीश कळंगुटकर यांने प्रथम क्रमांक…

Read Full News

बांद्यात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या पुढाकाराने ग्रामसचिवालय, बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे २०० लाभार्थ्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली.शिबिराचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून…

Read Full News

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वेदिका नाईक व देवराव प्रभूची ‘नायपर’ या राष्ट्रीय संस्थेत निवड…

⚡सावंतवाडी ता.२४-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च औषधनिर्माण शिक्षण व संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) मध्ये प्रवेश मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कॉलेजची विद्यार्थीनी वेदिका भास्कर नाईक हिची नायपर, अहमदाबाद येथे एम.एस. फार्माकोलॉजी अँड टॉक्सीकॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी…

Read Full News

आषाढी एकादशीनिमित्त श्री देव विठ्ठल-रुक्माई मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

सावंतवाडी, ता. २४ : येथील श्री देव विठ्ठल-रुक्माई मंदिरात आषाढी महाएकादशीनिमित्त शनिवार, २५ जुलैपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व महापूजा होणार आहे. महापूजेचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी शेखर…

Read Full News

सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणीला गंडा

दोन लाखांहून अधिकची फसवणूक:संशयीताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. कणकवली : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीला शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २ लाख २४ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (वय ५२, रा. तोंडवली) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली…

Read Full News

You cannot copy content of this page