Headlines

Global Maharashtra Breaking News

आ नाईक यांनी कितीही प्रयत्न केला तरी दहीहंडी उत्सव आम्ही करणार…

निलेश राणे:आमच्यापेक्षा मोठा उत्सव करून दाखविण्याचे आ नाईक यांना दिले आवाहन.. ओरोस ता ५-:कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवावा. जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना…

Read Full News

भरड धान्य जनजागृतीसाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे अभियान…

ओरोस ता ५-:चालू खरीप हंगामामध्ये सिंधुदुर्ग मध्ये 50 एकर क्षेत्रावर भरडधान्य लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा किर्लोस कृषी विज्ञान केंद्र प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी दिली. नाचणीच्या बियाण्याचा पुरवठा कृषी विज्ञान केंद्राद्वारे 500 शेतकऱ्यांना करण्यात आला. त्याचे लागवड बाबत जनजागृती सुद्धा…

Read Full News

लाखे समाज वस्तीसाठी 25 घर उपलब्ध करून द्या…

समाजाकडून मागणी: मंत्री दीपक केसरकर यांचे वेधले निवेदनद्वारे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-: लाखेवस्तीसाठी प्रशासनाने 25 घर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाखे वस्ती समाज व रासाई कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच मंत्री केसरकर यांना सादर केले. याबाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की सावंतवाडी शहरातील…

Read Full News

पाडलोसमध्ये 10 ऑगस्ट रोजीजिल्हास्तरीय भजन स्पर्धा…

बांदा ः प्रतिनिधीपाडलोस गाव व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी संध्या. 5 वा. श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा पार पडणार. भजन स्पर्धेचे तिसरे पर्व असून यावर्षी ‘करूया भजन थाटांच्या संगतीने’ संकल्पनेवर आधारीत आहे. स्पर्धेसाठी 8 ते 10 संघांची निवड केली जाणार आहे. प्रथम पारितोषिक रुपये 7001…

Read Full News

साईप्रसाद काणेकर यांनी मच्छी मार्केट उदघाटनाची मागणी करणे हास्यस्पद…

सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच बाळु सावंत:श्रेय लाटणे ही काणेकरांची नेहमीचीच सवय.. ⚡बांदा ता.०५-: पूर्णत्वास आलेल्या मच्छी मार्केटच्या वास्तूचे उद्घाटन करण्याचे ग्रामपंचायतीने एकत्रित बसवून ठरविले असताना सदरची माहिती उ. बा. ठा. चे सदस्य साईप्रसाद काणेकर यांना मिळताच त्यांनी उदघाटनाची अशी मागणी करणे खोडसाळ पणाचे आहे. उदघाटन होणारच आहे याची कुणकुण लागताच उलट उदघाटनाची मागणी करुन…

Read Full News

श्रावणमासात मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम…

मालवण (प्रतिनिधी) मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी आदी मंदिरात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त पहिला श्रावण सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी श्री देव रामेश्वर मंदिर येथे सायं. ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, शनिवार, दि. १० रोजी पहिला दादरा (खापरेश्वर) (सायं. ६.३० वा. निघतील),…

Read Full News

स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची मनीष दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही…

राजबा सावंत यांचा प्रथमेश तेलींना प्रत्युत्तर:उगाच या भागात ढवळाढवळ करू नये; अन्यथा सायमन गो बॅक” नारा द्यावा लागेल.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: ज्या प्रथमेश तेलींना स्वतःच्या गावचा पत्ता नाही त्याची दळवींवर टीका करण्याची पात्रता नाही असा पलटवार होडावडे उपसरपंच राजबा सावंत यांनी केला आहे.दरम्यान बाहेरून येऊन या भागात राजकीय ढवळाढवळ करण्याची गरज नाही . पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते,…

Read Full News

माशांवर मगरीचा ताव; मोती तलावात दिल दर्शन..

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मोती तलावात पुन्हा एकदा मगरीने दर्शन दिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोती तलावात आज सदर मगर माशाला पकडत असल्याचे फोटो दिसत आहे.. हे मगर पावसाच्या पाण्याने आल्याचे बोलले जात आहे आलेखा प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे

Read Full News

महावितरणची न्युट्रल तार तुटल्याने वीज प्रवाह दुप्पट होऊन टेंबवाडीत अनेकांची उपकरणे जळून नादुरुस्त…

कणकवली : महावितरणची पोल वरील न्युट्रल तार तुटून वीज पुरवठा अचानक दुप्पटीने वाढल्याने टेंबवाडीतील अनेक वीज ग्राहकांची चालू असलेली हजारो रूपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. हा प्रकार शुक्रवारी पहाटे ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडला. दरम्यान टेंबवाडीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान महावितरणच्या शहर विभागाच्या कार्यालयातील अधिकार्याशी…

Read Full News

सोन्याची चोरी करणाऱ्या महिलेला डोंबिवली येथून अटक…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गची कारवाई. कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ येथे गौरी अलंकार ज्वेलर्स मधून ९३ हजार रुपयांचे दागिने चोरणारी महिला होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सिंधुदुर्ग पोलिस पथकाने मुंबई सागाव, डोंबिवली ( पुर्व ) येथून अटक करण्यात आली आहे.ही घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली होती. याची फिर्याद सुमित सुधीर मालडीकर, रा. फोंडाघाट,…

Read Full News

You cannot copy content of this page