श्रावणमासात मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम…

मालवण (प्रतिनिधी)

मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी आदी मंदिरात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे.

यानिमित्त पहिला श्रावण सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी श्री देव रामेश्वर मंदिर येथे सायं. ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, शनिवार, दि. १० रोजी पहिला दादरा (खापरेश्वर) (सायं. ६.३० वा. निघतील), रविवार, दि. ११ रोजी दोन्ही दादरे रांजेश्वर, सिसमोडा (सायं. ६.३० वा. निघतील), दुसरा श्रावण सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी श्री देवी सातेरी जत्रौत्सव, सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, तिसरा श्रावण सोमवार दि. १९ रोजी श्री देव रामेश्वर मंदिर येथे सायं. ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, चौथा श्रावण सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी रात्रौ १२ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे गोकुळाष्टमी उत्सव, मंगळवार, दि. २७ ते ३० ऑगस्ट पर्यंत रोज सायं. ७.३० वाजल्यापासून श्री देव नारायण मंदिर येथे पुराण वाचन व किर्तनाचा कार्यक्रम, मंगळवार, दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात किर्तन व गोपाळकाला शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी (व्दादशी) सायं. ५ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे गोपाळकाला, पाचवा सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र, सकाळी ९.३० वाजता श्री वरदशंकराची महापूजा, दुपारी १ वाजल्यापासून तिर्थप्रसाद श्री देवी भावई जत्रौत्सव – सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले.

You cannot copy content of this page