Headlines

Global Maharashtra Breaking News

महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेणे आवश्यक…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू:महाराजांचे विचार सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारकरले पाहिजे… ⚡मालवण ता.२९-:माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत महाराजांचे विचार सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारकरले पाहिजे. तसेच अशा महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन…

Read Full News

नारायण राणे यांची राडा संस्कृती पाहून त्यांच्या मतदारांना आता पश्चाताच होतोय…

हरी खोबरेकर:राजकोट येथे झालेल्या प्रकाराने जिल्ह्यात पुन्हा एकदा राडा संस्कृती जिवंत झाली.. ⚡मालवण ता.२९-: मंत्री पद मिळेल, मोदी व शहा यांच्यासमोर मिरवता येईल या हेतूने खास. नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यात येणाऱ्या युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अडविण्याचा नियोजित कट केला. मात्र, हा प्रयत्न शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने हाणून पाडला. शिवसैनिक काय असतो हे राणेनी पाहिले. राजकोट…

Read Full News

अतिवृष्टीने देवगड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्टवादीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर…

⚡देवगड ता.२९-: देवगड तालुक्यातील रस्त्यांचा दुरावस्थेबाबत राष्टवादी काँग्रेसने बांधकाम विभागाच्या अधिाकाऱ्यांना धारेवर धरले.गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरूस्त करा व झाडीझुडपे तोडून रस्ते वाहतुकीस सुयोग्य करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. देवगड तालुका शरद पवार गट राष्टवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवून रस्त्यांचा दुरावस्थेबाबत कनिष्ठ अभियंता…

Read Full News

वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडले…

दागिने व रोख रक्कम लंपास:पोलीस घटनास्थळी दाखल.. ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गालगत वेत्ये खांबलवाडी येथे बंद घर फोडले आहे. अज्ञात चोरट्याने घरच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून सीताराम पाटकर कुटुंबीय हे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपले घर बंद करून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात धार्मिक…

Read Full News

सावंतवाडी शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.२९-: शहरातील तरुण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या निधनामुळे नेवगी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सावंतवाडी शहरातील सर्व व्यापारी सहभागी आहेत. म्हणून आज शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश सूर्यकांत नेवगी यांना शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीतील असंख्य व्यापारी उपस्थित होते,

Read Full News

मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा…

आमदार वैभव नाईक यांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी.. ⚡ओरोस ता.२९-: पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Read Full News

राजकोटच्या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशानमार्फत सखोल चौकशी करा…

सकल मराठा समाज सावंतवाडीने प्रांताधिकारी यांच्याकडे केली मागणी:सीताराम गावडे यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज शिष्टमंडळाने दिले निवेदन… सावंतवाडी : अखंड विश्वाचं दैवत असणाऱ्या आणि तमाम भारतीयांच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण राजकोट येथे पुतळा कोसळून झालेली विटंबना ही तमाम मराठी मुलखासाठी शरमेची बाब आहे. या घटनेचा निषेध करावा…

Read Full News

बाजारपेठेत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

संजू परब: बाजारपेठीतील भाजीविक्रेत्यांच्या समस्यांबाबत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी बाजारपेठेत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा गवत मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणून बसवणार असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत श्री परब यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांच्या समस्या बाबत भेट घेत पाहणी…

Read Full News

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजनी मंडळांना साहित्य वाटप…

भाजपतर्फे संदीप गावडे यांचा उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ची माहिती संदीप गावडे यांनी आज येथे दिली.श्री गावडे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते…

Read Full News

बाव ग्रामस्थांचे सा.बा. ऑफिस समोर ठिय्या आंदोलन…

दोन दिवसात रस्स्यावरील खड्डे देणार भरून:सा. बा. विभागाने दिले लेखी आश्वासन.. कुडाळ : कुडाळ ते बाव, कविलकाटे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अनेक दिवस मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज ग्रामस्थांनी कुडाळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांवर धडक देत ठिय्या…

Read Full News

You cannot copy content of this page