माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू:महाराजांचे विचार सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारकरले पाहिजे…
⚡मालवण ता.२९-:
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत महाराजांचे विचार सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारकरले पाहिजे. तसेच अशा महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रभू पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांना दैवत समान आहेत महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात कित्येक वर्ष कुणालाही जमलं नाही असे कर्तबगार करून दाखविली त्यामुळे प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, अस्मिता आहे. महाराजांप्रती देवासारखी भावना लोकांमध्ये आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कशामुळे कोसळला दुर्घटना कशामुळे घडली याची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे ही समिती आपल्या पद्धतीने दुर्घटनेची चौकशी करेल तोपर्यंत आपण सर्वांनी वाट पाहणे गरजेचे आहे या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जेवढे दुःख झाले असेल तेवढेच दुःख आम्हा सर्वांना झाले आहे त्यांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी तात्काळ मागणी केली या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागे जनमानसाची एक वेगळीच भावना असते. या महामानवांकडून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल या भावनेतून आपण त्यांचे पुतळे उभारत असतो आणि असे पुतळे चिरकाल टिकले पाहिजेत अशी सार्थ अपेक्षा असते भविष्यात महापुरुषांचे पुतळे उभारताना काळजी घेऊनच काम केले पाहिजे कोकणी माणसाने मला प्रचंड प्रेम दिले यामुळेच त्यांच्यावर माझे तितकेच प्रेम आहे. म्हणूनच याच तळमळीने छत्रपतींना वंदन करण्यासाठी राजकोट येथे आल्याचे ते म्हणाले
फोटो ….
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी राजकोट किल्ला येथे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न झालेल्या पुतळ्याच्या दुर्घटनेची पाहणी केली.
