Global Maharashtra Breaking News

खडपडे येथील पट्टेरी वाघाच्या अस्तित्वामुळे इकोसेन्सेटिक झोन याचिकेला भक्कम पुरावा..

स्टॅलिन दयानंद ; अखेर वनविभागाला वाघाचे अस्तित्व मान्य करावे लागले.. ⚡सावंतवाडी ता.२०-: राष्ट्रीय संशोधन अनुसज्ञान संस्था देहराडून यांच्या सर्वेक्षणानुसार मांगेली ते सह्याद्री पट्ट्यातील राधा नगरी अभयारण्य पर्यंत बावीस पट्टेरी वाघांचे अस्तित्व आढळले होते परंतु वन विभाग हे अस्तित्व नाकारत होता मात्र दोडामार्ग तालुक्यात खडपडे येथे आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे वन विभाग उघडा पडला आहे. वनविभागाला त्यामुळे…

Read More

महायुतीचा जो उमेदवार देणार त्याचा सर्व शिवसेना पदाधिकारी एकमताने काम करतील…

सचिन वालवालकर:किनारपट्टी भागासाठी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काशिनाथ नार्वेकर यांची नियुक्ती.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचाच उमेदवार असावा असा आग्रह आपला पक्षश्रेष्ठींकडे आहे. महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार देण्यात येईल त्याचा सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते एकमताने काम करतील असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला. दरम्यान यावेळी…

Read More

उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला-आनंदवाडी येथील डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एप्रिल महिन्यात होणा-या डॉ.आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. फोटो – विठ्ठल जाधव

Read More

जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे घवघवीत यश…

⚡मालवण ता २०-: महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत शालेय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयानेघवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने गट क्रमांक चार मधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत…

Read More

मेढा येथे कासवाच्या पिल्लांना सोडले समुद्रात…

⚡मालवण ता.२०-: मालवण मेढा येथील समुद्र किनारी ऑलीव्ह रीडले कासवाच्या संरक्षित करून ठेवलेल्या अंड्यांमधून आज पिल्ले बाहेर आल्यावर या पिल्लांना कासव मित्र कीर्तिदा तारी व करण कुबल व यांच्यासह सहकाऱ्यांनी समुद्रात सोडले. यावेळी ६५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. मालवण मेढा येथील कीर्तिदा तारी यांच्या घरानजीकच्या समुद्र किनाऱ्यावर दि. ३१ जानेवारी रोजी ऑलीव्ह रीडले कासवाने अंडी…

Read More

जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.२०-:मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी जिम्नॅस्टिक या खेळाबद्दल माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्याच्या हेतूने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक सुहास लोहार यांचे प्रशिक्षण शिबिर जय गणेश इंग्लिश स्कुल मध्ये संपन्न झाले. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.शरद परुळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने मुले आणि मुली त्यांच्या…

Read More

महिलांनी कायदा व संविधान समजून घेणे आवश्यक…

ऍड. देवदत्त परुळेकर:सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप. ⚡मालवण ता.२०-: कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून घेणे गरजेचे आहे. तसेच जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतात महिलांना लगेच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे संविधानही समजून घेणे आवश्यक आहे, असे मत बॅ….

Read More

माजगाव महावितरणच्या उपकेंद्रातशॉर्ट सर्किटमुळे लागली आग…

अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल:आग आटोक्यात आणण्यात यश.. ⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यातील माजगाव उद्यम नगर येथे असलेल्या महावितरणच्या उपकेंद्रात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. उपकेंद्रात लागलेली आग दुपारची वेळ असल्याने लगेच आजूबाजूच्या परिसरात पसरली. त्यानंतर सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने…

Read More

चला हसत खेळत शिकूया…

मिलाग्रिस हायस्कूल येथे उपक्रम:केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर यांनी केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल येथे ‘चला हसत खेळत शिकूया ‘ या शाळेच्या कृती अध्यापन वर्गाचे उदघाटन सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री. कमलाकर ठाकूर सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल ही कृतीतून व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारी…

Read More

आपलं सरकार पोर्टल वर दाखले न मिळाल्यास १ एप्रिलला एप्रिल फुल आंदोलन…

सतिश सावंत : महायुती सरकारने मराठा आरक्षणचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची दिशाभूल.. ⚡कणकवली ता.२०-: सध्या राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. सिंधुदुर्गात पोलीस भरतीसाठीच्या उमेदवाराना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही आहे. येत्या दोन दिवसांत आपलं सरकार पोर्टल वर हे दाखले न मिळाल्यास आचारसंहिता काळात…

Read More
You cannot copy content of this page