Headlines

Global Maharashtra Breaking News

सर्वोच्च न्यायालयातील चार वर्षांच्या लढ्याला अखेर यश…

संकेत हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.. ⚡कणकवली ता.११-: जिद्द, चिकाटी आणि न्यायासाठीचा प्रदीर्घ संघर्ष अखेर यशस्वी ठरला. संकेत सुधीर हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या यशामागे सन २०२२ पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याची मोठी भूमिका आहे. नोकरीसंदर्भातील बाबींसाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा…

Read Full News

सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी : येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुसळे यांनी महसूल विभागात प्रदीर्घ सेवा बजावली होती. आपल्या सेवाकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण,…

Read Full News

सावंतवाडीतील 8 दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उत्साहात समारोप…

⚡सावंतवाडी ता.११- : आचार्य बाळकृष्ण जी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपरिषद, महाराष्ट्र योगशिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे आयोजित 8 दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा मंगळवार दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात समारोप झाला. शिबिराच्या आठव्या व सांगता दिनी सकाळी 5:30 वाजता सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. प्रकाश तेंडोलकर,…

Read Full News

चिवला बीचवर स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित…

⚡मालवण,ता.११-:मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती यांच्या संकल्पनेतून मालवण येथील चिवला बीच येथे आज मंगळवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला आहे मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष श्री. सहदेव बापर्डेकर यांच्या सहभागाने आजचिवला बीच…

Read Full News

सिंधुदुर्गातील ६ वी ते ११ वी च्या सर्व रिक्त जागा प्रणालीवर तात्काळ दाखवा…

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात एल्गार; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन… ​सिंधुदुर्गनगरी, ता.११: राज्य शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत ‘पवित्र’ प्रणालीवर प्राधान्यक्रम नोंदवताना निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पात्र बी.एड. आणि अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण उमेदवार तीव्र चिंतेत सापडले आहेत. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे योग्य रीतीने दर्शवली जात नसल्याने स्थानिक उमेदवारांवर बेरोजगारीची टांगती तलवार…

Read Full News

ओसरगाव टोलनाक्यावर भीषण अपघात…

मिनीबसची उभ्या ट्रकला धडक:दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढले.. ⚡कणकवली ता.११-: ओसरगाव टोलनाक्यावर मध्यरात्री १:३०वा. च्या सुमारास मिनीबसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मिनीबसच्या चालकाचा पाय वाहनामध्ये अडकला. चालकाचे प्राण वाचवून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विविध यंत्रणा घटनास्थळी…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत‘हर घर तिरंगा’ अभियांतर्गत 11 ऑगस्ट पासून उपक्रम…..

श्री. दिलीप गिरप ; गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी शहरात भव्य “तिरंगा रॅली”. वेंगुर्लाशासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या निर्देशानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मंगळवार दि. ११ ते शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read Full News

पिंगुळीत वारंवारच्या वीजखंडितवर व्यापारी आक्रमक

महावितरणकडून आठ दिवसांत तोडग्याचे आश्वासन कुडाळ : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.व्यापाऱ्यांनी सांगितले की, सततच्या वीजखंडितीमुळे दुकानदारांचा व्यवसाय…

Read Full News

सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोत दुर्गंधीचे साम्राज्य !

मंदार शिरसाट यांचा न.प. ला ८ दिवसांचा अल्टिमेटम कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज कचरा डेपोची पाहणी करून नगरपंचायतीचे स्वच्छता…

Read Full News

आंबोलीतील चिरेखाणीत बुडून इन्सुलीतील ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू…

⚡आंबोली ता.१०- : आंबोली येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली–सांगेलीच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्युअर अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. या बचाव…

Read Full News

You cannot copy content of this page