निरोगी आयुष्याच्या घोषणा अन् शहरात दुर्गंधीचे साम्राज्य..

कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल..

कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतची गटारे ठिकठिकाणी उघडी पडलेली आहेत. काही गटारे तुंबलेल्या स्थितीत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याच मार्गावरील रस्त्याची स्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांना भगदाड पडले असून, रस्ता देखील सुस्थिती नाहीय. तसेच रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वाहनचालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

नगरपंचायतीच्या कार्यालयासमोरच ही अवस्था असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराच्या विकासाला गालबोट लावणाऱ्या या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन गटारे स्वच्छ करणे, झाकणे आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

You cannot copy content of this page