“लकरकोट (बांदा) येथे २६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२५-: श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार असून, परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
श्री दत्त मंदिर, लकरकोट (बांदा) येथे आयोजित या शिबिरातून गरजू रुग्णांना मदत होणार असून, समाजातील प्रत्येक नागरिकाने “रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात गोवा बांबोळी रुग्णालयाची रक्तपेढी रक्त संकलन करणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.त्यामुळे युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page