Headlines

Global Maharashtra Breaking News

आयनल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भाई साटम…

⚡कणकवली ता.३१-: आयनल गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रविण उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी सरपंच सौ. रिद्धी दहीबांवकर, विलास हडकर, भगवान मसुरकर, आदेश ओटवकर, सौ. देवयानी दहीबांवकर, देवेंद्र दहीबांवकर, संदीप घाडीगांवकर, सुंदर साटम, दीपक मेस्त्री, दशरथ दहीबांवकर आदींची निवड करण्यात आली आहे. तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रविण उर्फ भाई साटम…

Read More

चिंदर पंचायत समिती प्रभारी पदी प्रकाश मेस्त्री…

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केली निवड.. ⚡मालवण ता.३१-: भारतीय जनता पार्टी संघटनात्मक तालुकास्तरीय निवडी काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बाकी असलेल्या निवडी जाहीर होत आहेत. चिंदर पंचायत समिती प्रभारी रिक्त असलेल्या पदावर चिंदर येथील उद्योजक प्रकाश दिनकर मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश…

Read More

समाज सुधारक कै. रावबहादुर सि. के. बोले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शीत व्हावे…

गुरुनाथ मिठबावकर यांनी वेधले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे लक्ष.. ⚡मालवण ता.३१-: भंडारी समाजातील सुप्रसिध्द समाज सुधारक कै. रावबहादुर सि. के. बोले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी भंडारी समाज दादरचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांनी भंडारी समाजाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. भंडारी…

Read More

मेनरोडपूर्ती मर्यादित खड्डे न बुजवता शहरातील अंतर्गत रस्त्या मधील खड्डे बुजवा…

काँग्रेसची मागणी: अन्यथा तीव्र आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शहरामधील रस्ताची झालेली खड्डेमय दुरावस्था पाहता मेनरोडपूर्ती मर्यादित खड्डे न बुजवता शहरातील अंतर्गत रस्ता यामधील खड्डे सुद्धा गणेश चतुर्थीच्या अगोदर बुजवावे अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावंतवाडी शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड.राघवेंद्र नार्वेकर यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला दिला आहे. आज शहरातील रस्तत्याची झालेली खड्डेमय दुरावस्थाची…

Read More

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे रायफल शूटिंग स्पर्धेत यश…

⚡मालवण ता.३१-: क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे आयोजित १९ वर्षाखालील मुले रायफल शूटिंग मधील पिप साईट या क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेतील कु. संदेश राम शिर्के याने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक…

Read More

मालवणच्या बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल प्रथम…

मालवण दि प्रतिनिधीमॅग्रोव्ह फाउंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स भारतीय वनविभाग आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ‘समुद्रमंथन’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे द्वितीय – हमावणी (शेठ म. ग. हायस्कूल देवगड), तृतीय – तरंगत्या…

Read More

शिवपुतळा आठ महिन्यातच कोसळतो; मोदींची गॅरंटी गेली कुठे…?

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा सवाल:मोदींनी माफी मागूनही अशा प्रकारचे गंभीर कृत्य कधीही माफ होणार नाही.. ⚡मालवण ता.३१-:नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. हा पुतळा आठ महिन्यातच कोसळला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी गेली कुठे ? मोदींची गॅरंटी आता संपलेली आहे. मोदींनी माफी मागूनही अशा…

Read More

माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हाच मला समजलेला जगण्याचा धर्म…

ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: धर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. धर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे मर्म असायला हवे. आमच्या सावंतवाडीतील ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी स्वतः देखील…

Read More

ठाकरे सेनेने बांदा आरोग्य केंद्राला धडक देत जाब विचारला…

⚡बांदा ता.३१-: बांदा शहरात सातत्याने डेंगीचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आज शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान आणि ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. गणेश चतुर्थी आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने काय उपाययोजना…

Read More

कणकवली येथील व्यापारी शांताराम म्हापसेकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.३१-: बाजारपेठ येथील शांताराम जगन्नाथ म्हापसेकर ( वय ९२ ) यांचे शनिवारी पहाटे ५.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. कणकवली बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून सायकल विक्रीचा व्यवसाय करत होते. कणकवली शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ते लोक परिचित होते. त्यांच्या पश्चात ५ मुलगे , सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत शोकांकुल वातावरणात…

Read More
You cannot copy content of this page