Headlines

Global Maharashtra Breaking News

‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार १२५ क्षयरुग्णांचे घेतले पालकत्व…

क्षय रुग्णांच्या उपचारा सोबत पोषणाची गरज पूर्ण करणारा पालकमंत्री राणे यांनी हाती घातला उपक्रम:पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२५ उपचारित क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहार देण्याची जबाबदारी स्वीकारली.‘टीबी मुक्त भारत अभियान’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी, ता. १७ -: येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी सावंतवाडीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरासह पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Read Full News

सावंतवाडीतील टेलिफोन कॉलनीत तीन बंगले फोडले…

दागिने व दोन दुचाकी लंपास:सीसीटीव्ही बंद असल्याने तपासासमोर अडचण.. सावंतवाडी : शहराच्या सीमेवरील टेलिफोन कॉलनीतील तिनं बंगले चोरट्यांनी फोडले. काल रात्री हा प्रकार घडला. यातील काही बंगले हे बंद असल्याचा फायदा घेत फोडण्यात आलेत. सावंतवाडी पोलीसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास करत आहेत. तर फोडलेल्या एका घरातील फोन, लॅपटॉप तसाच असून बेडरूमधील…

Read Full News

सावंतवाडी नगर परिषदेमार्फत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षांनंतर पुन्हा नव्याने व मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून शहरामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले मॅडम यांच्या हस्ते…

Read Full News

पॉकेटमनीतून बचत; गरजूंना मदतीचा हात!

कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श कुडाळ : सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून देत कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स ‘बी’च्या विद्यार्थिनींनी आपल्या पॉकेटमनीतून बचत करून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. विद्यार्थिनींनी सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथील लाभार्थींना अन्नधान्य व विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.विद्यार्थ्यांना पालकांकडून मिळणाऱ्या…

Read Full News

छोटेसे आवाहन… आणि ५५ जणांचा यशस्वी रांगणागड ट्रेक

लहानथोर सर्व वयोगातील सर्वानी एकत्र येत राबवली ट्रेक मोहीम:पिंगुळीतील सखे सोबती गृपचे सहकार्य.. ⚡कुडाळ ता.१७-: आजच्या मोबाईलच्या युगात लहानमुले, तरुण, महिला यांच्यासह सर्वानी एकत्र यावे, निसर्गाच्या सानिध्यासह गिर्यारोहणासारख्या धाडसी खेळाचा आनंद घ्यावा यासाठी कुडाळ. पिंगुळी आणि आसपासच्या काही जणांनी एकत्र येत रविवारी रांगणागड ट्रेकचे आयोजन केले होते. पाच-सहा जणांच्या गृपने जाण्यापेक्षा ५०-६० जणांनी एकत्र जाऊ…

Read Full News

श्रावणी सोमवारनिमित्त माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंची पाटेकर देवस्थानला भेट…

सावंतवाडी : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी पहिल्या सोमवारच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीच आराध्य दैवत श्री पाटेकर देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी पाटेकर देवाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आशीर्वाद घेतले. पाटेकर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर माजी सरन्यायाधीशांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

तळवडे बाजारपेठेतील इस्त्री दुकानास आग…

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक विजय कुंभार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला. या दुर्घटनेत सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गणपती…

Read Full News

यशाची दखल थेट विद्यार्थ्यांच्या दारी…

शिष्यवृत्तीधारकांचा अनोखा गुणगौरव:शिवसेना-युवासेना आणि पं. स. सदस्य योगेश धुरी यांचा अभिनव उपक्रम.. ⚡कुडाळ ता.१७-: तालुक्यातील माणगाव–नांनेली परिसरातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट त्यांच्या घरी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला.‘आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात…

Read Full News

‘गुरुवंदना’तून रंगला भक्तिसंगीताचा सुरेल सोहळा…

नमो शारदा संगीत क्लासेसचा उपक्रम उत्साहात:जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.. कुडाळ : संगीत रत्न, भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा संचलित ‘नमो शारदा संगीत क्लासेस’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला स्थानिक नागरिकांसह संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सोहळ्याचे उद्घाटन नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते…

Read Full News

You cannot copy content of this page