नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे…
विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ उपक्रमाला मातोंड-तळेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केलेल्या परब यांच्या पुढाकारातून मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. भाजप…
