Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवा नायक खून प्रकरणी तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने घेतले ताब्यात:सर्व बाजूनी तपास होणार ; पोलिसांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ शहरातील भाजी विक्रेता विक्रेता शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णप्पा नायक (३०) याच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सिताराम बाबू राठोड (वय 30), अजित अशोक चव्हाण (२१), आदिक अशोक चव्हाण (१९) यांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बांदा येथे शिताफीने ताब्यात घेतले….

Read Full News

बाहेरचावाडा परिसरात रस्त्यात असलेला मातीचा ढिग देतोय अपघाताला निमंत्रण…

एसटीसह बांधकाम विभाग सुशेगाद; अन्यथा वृक्षारोपण करू,नईम मेमन यांचा इशारा… सावंतवाडी ता.१६: एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक वायर टाकण्यासाठी बाहेरचावाडा परिसरात खोदकाम केल्यानंतर भर रस्त्यात तसाच ठेवण्यात आलेला मातीचा मोठा ढिगारा अपघाताला निमंत्रण देत आहे.याबाबत शरद पवार राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ हा ढिग काढुन रस्ता पुर्ववत करा. अन्यथा त्या…

Read Full News

सैनिक पतसंस्थेतर्फेसेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.१६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या वतीने आर्मी डे चे निमित्त साधुन बुधवार १५ जानेवारी रोजी पतसंस्थेच्या कोलगाव शाखेतील सभागृहात १ जानेवारी २०२४ ते ३१ डीसेंबर २०२४ मधील सेवानिवृत्त सैनिकांचा संस्थेचे सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच प्रतीवर्षीप्रमाणे संस्थेकडे ज्या ठेविदारांसाठी लागू असलेल्या ‘लकी डॉ…

Read Full News

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता मोपा विमानतळ , गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता मोटारीने मातोंड, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता मातोंडा ता. सावंतवाडी येथे…

Read Full News

देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक, शेतकरी, बागायतदार यांची शनिवार १८ रोजी सभा…

सकाळी १० वाजता मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे केले सभेचे आयोजन.. ⚡देवगड ता.१६-:देवगड तालुक्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदार त्याचप्रमाणे जीआयधारक शेतकरी यांना कळविण्यात येते की,देवगड हापुस आंब्याच्या नावाखाली होणारी बोगस विक्री थांबविण्यासाठी तालुक्यातील आंबा शेतकऱ्यांना आंबा विक्री करण्यासाठी युनिक कोड असणारा स्टिकर देण्याचा निर्णय दिनांक २ जानेवारी २०२५ मागील सभेमध्ये घेण्यात…

Read Full News

डंपर चालकाच्या बेपर्वाईमुळे मोर्ले येथील युवकाचा मृत्यू…

डंपरची कागदपत्रे नाहीत; पोलिसांनी निःपक्ष तपास करण्याची मागणी.. ⚡दोडामार्ग, ता.१६-: मोर्ले येथील युवकाचा डंपर चालकाच्या बेपर्वाईमुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१६) साटेली भेडशी येथे घडली. कुडासे तिठ्याच्या अलीकडे असलेल्या बंटी टोपले यांच्या क्रशरवर जाण्यासाठी डंपरचालकाने आपल्या ताब्यातील डंपर अचानक वळवला आणि दोडामार्गकडे दुचाकीने जाणाऱ्या प्रसाद तुकाराम कांबळे (वय -२८ वर्षे, रा.मोर्ले) यांच्या दुचाकीला धडक दिली….

Read Full News

शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी…

प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर:जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मोफत सराव परीक्षा संपन्न.. ⚡ओरोस ता.१७-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले. शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा…

Read Full News

खिलाडूवृत्तीने खेळा…

विशाल तनपुरे:कुडाळ पं स क्रीडा महोत्सवाला सुरुवात.. ⚡कुडाळ ता.१६-: प्रत्येकाने खिलाडृवृत्तीने खेळावे .जिल्हा पातळीवर होणाऱ्या क्रीडा महोत्सवात कुडाळ तालुका पंचायत समितीने मानाची चॅम्पियनशिप आणावी  असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी क्रीडा महोत्सवात आज केले .कुडाळ तालुका पंचायत समितीच्या वतीने कुडाळ हायस्कूल मैदानावर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन…

Read Full News

निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा…!

⚡सावंतवाडी ता.१६-: श्री शिलकारी कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे, भंडारवाडी आयोजित शाळा नं. ३ येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त २६ जानेवारी रोजी रात्री ८. वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह व्दितीय ३००१ व सन्मानचिन्ह तृतीय २००१ व सन्मानचिन्ह इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २५ जानेवारी पर्यत समीर केरकर ८६००३७२८९३…

Read Full News

सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी…

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमेन असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली या सैनिक शाळेच्या स्थापनेस २१ वर्षे पूर्ण झाली. २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ही भव्य स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धावपटूंसाठी आयोजित करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page