सकाळी १० वाजता मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे केले सभेचे आयोजन..
⚡देवगड ता.१६-:
देवगड तालुक्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदार त्याचप्रमाणे जीआयधारक शेतकरी यांना कळविण्यात येते की,देवगड हापुस आंब्याच्या नावाखाली होणारी बोगस विक्री थांबविण्यासाठी तालुक्यातील आंबा शेतकऱ्यांना आंबा विक्री करण्यासाठी युनिक कोड असणारा स्टिकर देण्याचा निर्णय दिनांक २ जानेवारी २०२५ मागील सभेमध्ये घेण्यात आला होता.
त्यानुसार कामकाजास सुरुवात झालेली असून झालेल्या कार्यवाहीचा आढावा, तसेच काही शंका असतील तर त्यावर निर्णय घेण्यासाठी शनिवार दिनांक १८/०१/२०२५ रोजी सकाळी १० वाजता मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
