महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता मोपा विमानतळ , गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता मोटारीने मातोंड, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता मातोंडा ता. सावंतवाडी येथे आगमन व देवस्थान सदिच्छा भेट. दुपारी 3 वाजता मातोंडा, ता. सावंतवाडी येथून मोटारीने माडखोल सावंत फार्म ॲण्ड अग्रो टुरिझम, सावंतवाडीकडे प्रयाण व या ठिकाणी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग प्रेस क्लब वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 4 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने पेंडूर ता. मालवणकडे प्रयाण. सायं. 5 वाजता पेडूर ता. मालवण येथे आगमन व राखीव. श्री. वेताळ देवस्थान ट्रस्ट, पेंडूर आयोजित देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.30 वाजता पेंडूर ता. मालवण जि.सिंधुदुर्ग येथून मोटारीने मोपा विमानतळ गोवाकडे प्रयाण.
००००००

You cannot copy content of this page