विशाल तनपुरे:कुडाळ पं स क्रीडा महोत्सवाला सुरुवात..
⚡कुडाळ ता.१६-: प्रत्येकाने खिलाडृवृत्तीने खेळावे .जिल्हा पातळीवर होणाऱ्या क्रीडा महोत्सवात कुडाळ तालुका पंचायत समितीने मानाची चॅम्पियनशिप आणावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी क्रीडा महोत्सवात आज केले .कुडाळ तालुका पंचायत समितीच्या वतीने कुडाळ हायस्कूल मैदानावर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, बाळकृष्ण परब, अधीक्षक मृणाल कार्लेकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर आनंद कुंभार श्री हवालदार श्रीमती गीता कुडाळकर सुनिल प्रभु रवी पोवार महादेव तेली महादेव खरात सपना मसके तसेच प्रत्येक विभागाचे अधिकारी ग्रामसेवक,कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होता
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलित करून श्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री तनपुरे म्हणाले, पंचायत समिती कुडाळच्या माध्यमातून आज क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धा होणार आहेत या स्पर्धामध्ये प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने खेळावे. या ठिकाणी स्पर्धा करताना जिल्ह्यात आपली पंचायत समिती अव्वल स्थानावर कशी राहील या दृष्टीने सर्वांनी काम करावे असे सांगितले.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण सांगितले कि, स्पर्धा म्हटले की हार जीत असते. प्रत्येकाने आपल्या विविध खेळांचे दर्शन घडवीत या स्पर्धा यशस्वी कराव्यात. आजच्या स्पर्धात्मक वाटचाल करताना व्यायाम सुद्धा महत्त्वाचा घटक आहे असे सांगितले सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी पंचायत समिती म्हणजे ग्रामीण जनतेसाठी विकासाचे केंद्र आहे. शासनाच्या ग्रामीण जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळांपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कामकाज पंचायत समिती मार्फत चालते. ग्रामीण जनता व पंचायत समितीकडील योजना याचा दुवा म्हणून गावपातळीपासून
तालुकापातळीपर्यंत अधिकारी, कर्मचारी कामकाज करत असतात. त्यांचेमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे. त्यांचेमध्ये सांघिक भावना वृध्दीगत व्हाव्यात, एकोप्याची भावना निर्माण व्हावी, तसेच त्यांचेमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, कामकाजातील ताण तणाव दूर व्हावा यासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करणेत आले असल्याचे सांगितले
दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, धावणे बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील प्रभू यांनी केले
