Headlines

Global Maharashtra Breaking News

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच…

घनश्याम गांवकर:घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न.. ⚡कणकवली ता.१५-: ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एक एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल आणि येत्या पाच वर्षात घाडीगांवकर समाज भवन उभे राहील ,असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई या…

Read Full News

सर्प विज्ञान, मुलांच्या आहारावर गोपुरीत उद्या मार्गदर्शन…

कणकवली : वागदे येथील गोपुरी आश्रम येथे जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत उद्या सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मुलांचा दैनंदिन आहार आणि सर्प विज्ञान विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत होणाऱ्या या मार्गदर्शन वर्गात डॉ. नीलेश कोदे हे मुलांच्या दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन करून मुलांशी हितगुजही साधणार आहेत. सर्पमित्र प्रतीक सावंत…

Read Full News

कणकवली गडनदी पुलावरील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल…

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा.च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील आई आणि मुलाला जोरधार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी ट्रक चालक इक्‍बाल अब्‍दूल बेग (वय ५५, रा.चंदगड कोल्‍हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान अपघातातील गंभीर जखमी १० वर्षीय दक्ष जाधव या मुलावर गोवा बांबुळी…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर हळवल फाटा येथे रम्बलर स्ट्रिप्स घालण्याचे काम सुरू…

नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे समाधान:महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू;अपघातांनंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग.. कणकवली; मुंबई-गोवा महार्गावरील हळवल फाटा येथे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार शुक्रवारी गडनदीवरील उड्डाणपुलापासून महामार्गावर रम्बलर स्ट्रिप्स लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या अपघाताची गांभीर्याने…

Read Full News

जीवन असणारे पाणी गुणवत्तापूर्वक नसल्यास आरोग्याला हानी…

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे.. ओरोस ता १४पाणी हे जिवन आहे. मात्र हे पिण्याचे पाणी गुणवत्ता पुर्वक नसेल तर आरोग्याची हानी होऊ शकते. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश काबंळे यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात…

Read Full News

पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्र्यांचा जिल्ह्यातील १६० सरपंचांशी पत्रप्रपंच…

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्राद्वारे साधला संवाद:हर घर जल साठी केले अभिनंदन.. ओरोस ता १४हर घर जल झालेल्या जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी थेट अभिनंदन पत्र पाठवून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला आहे. आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबास व्यक्तिगत घरगुती नळजोडणीव्दारे प्रती माणसी, प्रती दिन किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करुन…

Read Full News

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेज ची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड…

⚡मालवण ता.१४-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागाअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेली तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा दीपक पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज पर्यंतच्या इतिहासात एनसीसी विभागातून राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली हर्षदा पवार ही पहिली खेळाडू ठरली…

Read Full News

वारगाव येथे मोशन सेन्सर एलईडी बल्ब ने होणार वीज बचत…

उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून मोशन सेन्सर स्ट्रीट लाईट चा शुभारंभ.. कणकवली : वीज बचत म्हणजेच वीज निर्मिती आहे. वीज पुरवठ्याच्या वाढत्या मागणीमुळे अनावश्यक विजेचाही वापर नकळत होतो. हाच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी वारगाव गावात मोशन सेन्सर एलईडी बल्ब स्ट्रीट लाईटसाठी वापरत असल्याचे वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांनी सांगितले. उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून वारगाव गावातील…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन्न …

मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड… ⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणारी जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिचा भारतातील उत्पादन प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहे….

Read Full News

देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती…

देवगड (प्रतिनिधी) देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे देवगड विभागाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने देवगड विभागाच्या तालुकाप्रमुख पदी रवींद्र भाऊ जोगल यांची नियुक्ती जाहीर करण्यात अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली.

Read Full News

You cannot copy content of this page