जीवन असणारे पाणी गुणवत्तापूर्वक नसल्यास आरोग्याला हानी…

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे..

ओरोस ता १४
पाणी हे जिवन आहे. मात्र हे पिण्याचे पाणी गुणवत्ता पुर्वक नसेल तर आरोग्याची हानी होऊ शकते. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश काबंळे यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हान, देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, देवगड, वैभववाडी गट विकास अधिकारी, वैभववाडी श्री जंगले, मालवण गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, कुडाळ गटविकास अदिकारी शाम चव्हाण, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी सर्व, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व आरोग्य अधिकारीआदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. काबळे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वत्र वॉटर प्युरिफायर वापरण्याचे नवे वेड आले आहे. मात्र या वॉटर प्युरिफायरची वेळेवर देखभाल केली गेली नसल्यास आजारपणाचा मोठा सोर्स होऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नियमित पिण्याच्या पाण्याचे सोर्स शुध्दीकरण करण्यात येत असतात. या शुध्दीकरणावर आरोग्य व पाणी कर्मचारी यांनी लक्ष ठेऊन गुणवत्ता पुर्वक पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. पाणी हे जसे जिवन आहे. तसेच सर्वात जास्त आजार हे हि दुषित पाण्यामुळेच होत असतात. त्यामुळे गुणवत्ता पुर्वक पाणी देणे हि आपली जबावदारी आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या जबाबदारीचे नियमित पालन करतात म्हणुनच जिल्ह्यात गेली कितेक वर्षे जलजन्य साथ जिल्ह्यात आलेली नाही. असे सागितले.

You cannot copy content of this page