पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्र्यांचा जिल्ह्यातील १६० सरपंचांशी पत्रप्रपंच…

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्राद्वारे साधला संवाद:हर घर जल साठी केले अभिनंदन..

ओरोस ता १४
हर घर जल झालेल्या जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी थेट अभिनंदन पत्र पाठवून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला आहे. आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबास व्यक्तिगत घरगुती नळजोडणीव्दारे प्रती माणसी, प्रती दिन किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करुन दिल्याने हा मंत्री पाटील यांनी पत्रप्रपंच केला आहे.
जिल्ह्यातील १६० सरपंचांना पाठविलेल्या पत्रात केंद्र व राज्य शासनाने हाती घेतलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यत आपल्या भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळजोडणीव्दारे गुणवत्तेचे पाणी प्रती माणसी प्रती दिन किमान ५५ लिटर उपलब्ध करुन दिले. याबाबत सरपंच यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहेत. तसेच पाणी घरोघरी पोचल्याने गावातील महिलांच्या राहणीमानात सहजता आली आहे. त्यामुळे वाचलेला वेळ कुटुंबाना विकासात व स्व:ताकरीता वापरता येणार आहे. यामुळे मला आनंद होत आहे. असे नमूद करण्यात आले आहे.
याच बरोबर मंत्री पाटील यांनी पत्रात या नळपाणी योजना शाश्वत टिकविण्यासाठी ५५ लिटर प्रती माणसी विहित गुणवत्तेसह व दैंनदिन पाणी पुरवठा होण्याकरीता स्त्रोताची निगा राखण्यात यावी. पाण्याच्या स्त्रोताचे संरक्षण करण्यात यावे. स्त्रोताचे पुनर्भरन करण्याकरीता ग्रामपंचायत स्तरावर योजना आखण्यात यावी. उपाय योजनाची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पाणी पुरवठा योजनाची नियमित पाणी पट्टी वसुली करण्याकरीता ग्रामसभेच्या माध्यमातुन सक्षम यत्रंणा उभारण्यात यावी. विज देयके वेळवर भरणा करण्यात यावी. पाणी पुरवठा स्त्रोताचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात यावे. पाणी शुध्दीकरण नियमित करण्यात यावे. स्त्रोताची वर्षातुन दोनदा जैविक व एकदा रासयनिक तपासनी करुन घ्यावी अशा सुचनाही सरपंच यांना करण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page