Headlines

Global Maharashtra Breaking News

आरवली सोन्सुरा येथील ज्येष्ट पत्रकार न्हानू चिपकर यांचे निधन…

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरा येथील रहिवासी आणि सद्या गोरेगाव मुंबई येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार न्हानू (राजन ) जयवंत चिपकर (वय ६२) यांचे आज १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले.वीस वर्षा पूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण भारत, रत्नागिरी टाईम्स, सिंधुदुर्ग समाचार या दैनिका पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर ते…

Read Full News

हळवल फाटा येथील त्या अपघाती वळणावर तात्काळ हायमास्ट बसवा…

वाहनचालक व नागरिकांची मागणी.. कणकवली : शहरातील वागदे गडनदी हळवल फाटा येथील त्या तीव्र अपघाती वळणावर हायमास्ट बसवण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती. कारण याठिकाणी होणारे अपघात हे रात्र वेळी झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकांना देखील या वळणाचा अंदाज येत नाही. जर या वळणावर एखादा हायमास्ट बसवला असता तर निदान या वळणाचा अंदाज वाहनचालकांना…

Read Full News

राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत नाधवडे येथील महादेव मंदिर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न…!

⚡वैभववाडी ता.१६-: बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यत नाधवडे येथील महादेव मंदिर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यस्तरीय गटात मंगेश मुद्रस उंबर्डे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर गावठी राज्यस्तरीय गटात जालिंदर गणपत कदम आरवली यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार प्रमोद जठार व राज्य…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते निशांत आणि रविकिरण तोरस्कर यांना पितृशोक…

⚡सावंतवाडी ता.१६-: महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक, कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी तोरसकर ( वय 80 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर व सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचे ते वडील होते. काही वेळातच त्याचे पार्थिक अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सबनीसवाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार…

Read Full News

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी चार लाखाचा मुद्देमाल जप्त…

राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: सावंतवाडीतील दोघे ताब्यात.. ⚡बांदा ता.१६-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना तेरेखोल नदी पुलावर य कारवाई करण्यात आली असून तब्बल 4,14,240 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी सावंतवाडीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश चव्हाण (वय35) सबनीसवाडा व…

Read Full News

अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेलीच्या दोन सुपुञांचा समावेश…

⚡सावंतवाडी ता.१५-: अरब देशातील सौदी अरेबिया देशाच्या रियाध या राजधानीत महाराष्ट्र प्रिमीयर लीग च्या पहिल्या पर्वाचे आयोजन ११ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत सौदी अरेबिया देशात कामानिमित्त असलेले न्हावेली गावचे सुपुत्र ओमकार मांजरेकर याला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे तसेचं या स्पर्धेत न्हावेलीचा आणखी एक सुपुञ संतोष मुळीक याची ‘सुल्तान एक्सप्रेस’ या…

Read Full News

१७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवगडमध्ये…

⚡देवगड ता.१५-:देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व.जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जामसंडे हायस्कुलसमोर इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे यांनी दिली. जामसंडे येथील भाजपा…

Read Full News

उबाठा सेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी, प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती…

⚡देवगड ता.१५-:उबाठा शिवसेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर नगरपंचायत विरोधी पक्षनेतेपदी नितीन बांदेकर, उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी आणि प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि तालुकाप्रमुख रविंद्र जोगल यांनी दिली. देवगड उबाठा शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत सुशांत नाईक आणि रविंद्र जोगल यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.यामध्ये नगरसेवक…

Read Full News

हिम्मत असेल तर पुन्हा निववडून येऊन दाखवा…

राजन नाईक यायचे ‘त्या’ नगरसेवकांना आव्हान:’त्या’ नगरसेविके विरोधात केस दाखल – मंदार शिरसाट.. ⚡कुडाळ ता.१५-: ठाकरे शिवसेनेतून फुटून भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकानी हिंमत असेल तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जावे, असे आव्हान ठाकरे शिवसेने कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी, भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना दिले.हे शहराच्या विकासासाठी नव्हे तर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजपात गेले…

Read Full News

शिवजयंती दिनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार…

खासदार नारायण राणे ,आम निलेश राणे आम केसरकर यांची उपस्थिती.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील बहूचर्चित राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय ,बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितीश राणे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला माजी…

Read Full News

You cannot copy content of this page