१७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवगडमध्ये…

⚡देवगड ता.१५-:
देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व.जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जामसंडे हायस्कुलसमोर इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे यांनी दिली.

जामसंडे येथील भाजपा पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत अजित गोगटे बोलत होते.यावेळी बाळा खडपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अजित गोगटे म्हणाले, माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. १५ फेब्रुवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी होणार असून या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी, खासदार नारायण राणे, भाजपा राष्टड्ढीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आ.दिपक केसरकर, आ.निलेश राणे, माजी आमदार विनय नातू, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमावेळी आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्मृतीगंध या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.आप्पासाहेब गोगटे युतीचे आमदार असताना त्यांच्या कार्यकाळातील शिवसैनिकांना निमंत्रण पाठविण्यात आले असून त्यांचासाठी कार्यक्रमस्थळी स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात आली आहे.आप्पासाहेब यांच्यासमवेत असलेले भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्यासहीत इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.या कार्यक्रमावेळी आप्पासाहेब गोगटे यांच्या नावे प्रथमच जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून हा पुरस्कार भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पु.ज.तथा काका ओगले यांना देण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी येणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात आहे.कार्यक्रमाचे नियोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती अजित गोगटे यांनी दिली.यावेळी वैभव बिडये,संजय बोंबडी, अ‍ॅड.अभिषेक गोगटे, कौस्तूभ जामसंडेकर, राजेंद्र वालकर, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, योगेश चांदोस्कर, कमलाकांत उर्फ बंड्या भडसाळे, नरेश डामरी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page